News18 Lokmat

'या' मतदारसंघात 101 उमेदवार, आयोगाला घ्यावा लागणार 1996 सालचा निर्णय?

1996 साली या मतदारसंघातून तब्बल 452 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.

News18 Lokmat | Updated On: Mar 28, 2019 10:31 AM IST

'या' मतदारसंघात 101 उमेदवार, आयोगाला घ्यावा लागणार 1996 सालचा निर्णय?

बेळगाव, 28 मार्च : लोकसभेच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वच पक्षांनी कंबर कसली असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत. जवळपास सर्व पक्षांनी उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. दरम्यान आता बेळगाव मतदार संघाची चर्चा सुरू आहे. सीमाप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे बेळगावमध्ये 101 उमेदवारानी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

सीमा लढ्याला बळ देण्यासाठी लोकवर्गणीच्या माध्यमातून उमेदवारी दाखल करण्यासाठी निधी उभारला जाणार आहे. मराठा मंदिरात झालेल्या समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी म.ए समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

लोकसभेच्या रिंगणात समितीने उतरावे किंवा अनेक उमेदवार उभा करावेत अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात होती. त्यानंतर समितीने हा निर्णय घेतला असून यामुळे अनेक पक्षांना धक्का बसला आहे. सीमाप्रश्न सोडवण्यासाठी बेळगाव मतदारसंघातून 101 पेक्षा अधिक अर्ज दाखल करण्यात येतील असे म.ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी बैठकीवेळी सांगितले.

बेळगाव मतदारसंघातून 1996ला अशाच प्रकारे विक्रमी उमेदवार अर्ज दाखल करण्यात आले होते. तेव्हा तब्बल 452 उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यात आल्याने 1 महिना निवडणूक पुढं ढकलावी लागली होती.

VIDEO : उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांची जुगलबंदी

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 28, 2019 10:31 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...