मराठी बातम्या /बातम्या /देश /झाशीमधल्या गावात होते ‘महारानी कुतिया’ची पूजा; गावकऱ्यांचं श्रद्धास्थान

झाशीमधल्या गावात होते ‘महारानी कुतिया’ची पूजा; गावकऱ्यांचं श्रद्धास्थान

 ‘कुतिया महारानी’ची मूर्ती

‘कुतिया महारानी’ची मूर्ती

भारताला मोठा ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभलेला आहे. हिंदू धर्मातल्या विविध जाती, जमातींमध्ये देवी-देवतांपासून, पशू-पक्षी, ग्रह-तारे, झाडं अशा निसर्गातल्या अनेक गोष्टी पूजनीय मानल्या गेल्या आहेत.

  • Local18
  • Last Updated :
  • Mumbai, India

    झाशी, 2 फेब्रुवारी : भारताला मोठा ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभलेला आहे. हिंदू धर्मातल्या विविध जाती, जमातींमध्ये देवी-देवतांपासून, पशू-पक्षी, ग्रह-तारे, झाडं अशा निसर्गातल्या अनेक गोष्टी पूजनीय मानल्या गेल्या आहेत. भारतात गायीला माता मानलं जातं. बैलाची नंदी म्हणून पूजा केली जाते. काही ठिकाणी त्यांची मंदिरंही आहेत; मात्र कुत्र्याचं मंदिर कधी पाहिलं आहे का? झाशीच्या मऊरानीपूर तालुक्यात कुतिया महाराणीचं मंदिर बांधण्यात आलंय. रेवन आणि ककवारा गावांच्या वेशीवर हे मंदिर आहे. या मंदिराबाबत काही कथा सांगितल्या जातात.

    या दोन्ही गावांच्या वेशीवर रस्त्याच्या कडेलाच एक चौथरा बांधून त्यावर काळ्या रंगातल्या महाराणी कुत्रीची मूर्ती स्थापन करून तिचं छोटंसं मंदिर बांधण्यात आलं आहे. आजूबाजूच्या नागरिकांची या मंदिरावर खूप श्रद्धा आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, हे मंदिर खूप जुनं आहे. ती कुत्री त्या दोन्ही गावांत राहत होती, असं त्यांचं म्हणणं आहे. त्या गावांमधल्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये ती जेवणासाठी उपस्थित राहायची. एकदा रेवन गावात जेवणावळी होत्या. त्यासाठी ती कुत्री रेवन गावात आली असता, तिथलं जेवण संपलं. त्यामुळे ती ककवारा गावात जेवण्यासाठी गेली; मात्र तिथलंही जेवण संपलं होतं. कोणत्याच गावात जेवायला न मिळाल्यानं ती उपाशी राहिली व भुकेनं तिचा जीव गेला.

    हेही वाचा - हे तर अजबच! आधी प्रेग्नंट आणि नंतर लग्न हा नक्की काय प्रकार, या परंपरेविषयी माहितीये का?

    इतिहासकार हरगोविंद कुशवाह यांच्या म्हणण्यानुसार, तिच्या मृत्युमुळे दोन्ही गावांतल्या लोकांना खूप वाईट वाटलं. त्यांना पश्चात्ताप झाल्यामुळे त्यांनी कुत्रीचा मृतदेह दोन्ही गावांच्या सीमेवर दफन केला. काही काळानंतर तिथे एक मोठा दगड तयार झाला. त्यानंतरच्या काही काळानंतर गावकऱ्यांनी तिथे मंदिर बांधलं. कोणत्याही शुभप्रसंगी आपल्या भोजनातला एक हिस्सा तिथे ठेवण्याची प्रथा आता पडलीय. यावरून या भागात एक म्हणही प्रचलित झालीय, असं हरगोविंद कुशवाह यांनी सांगितलं. बुंदेलखंडात ‘रेवन ककवाराकी कुतिया हो जाना’ ही म्हण खूप प्रचलित झालेली आहे. एखादी व्यक्ती कोणत्याही एका पक्षात राहत नसेल, तर त्यासाठी ही म्हण वापरली जाते.

    रेवन आणि ककवारा गावाच्या सीमेवर हे मंदिर आहे. एका चौथऱ्यावर काळ्या पाषाणात असलेली ‘कुतिया महारानी’ची मूर्ती आहे. गावातल्या स्त्रिया इथे येऊन पूजा करतात. मूर्तीला जल अर्पण करतात. रेवन गावातल्या गावकरी कुसुमलता यांच्या म्हणण्यानुसार, हे मंदिर लोकांसाठी श्रद्धास्थान आहे. ‘कुतिया महारानी’ लोकांच्या इच्छा पूर्ण करते. गेल्या अनेक वर्षांपासून या मंदिरात लोक भक्तिभावाने पूजा करतात.

    First published:

    Tags: Local18, Viral, Viral news