डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर लोटला भीमसागर

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर लोटला भीमसागर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरमध्ये हजारो भीमअनुयायी जमले आहेत. त्यामुळे दादरला भीमसागराचे रूप आले आहे असं म्हणायला हरकत नाही.

  • Share this:

मुंबई, 06 डिसेंबर : 'भारतरत्न' डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जगभर त्यांना आदरांजली वाहण्यात येतं आहे. मुंबईत दादर येथील चैत्यभूमीवर बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी लाखो आंबेडकरी अनुयायी देशभरातून दाखल झाले आहेत. काल रात्री बारा वाजता चैत्यभूमीत बुद्ध वंदना घेऊन बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यानंतर आंबेडकरी अनुयायींनी चैत्यभूमीत वंदन करण्यास सुरुवात केली. लाखोंच्या संख्येने येणाऱ्या आंबेडकरी अनुयायींची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महापालिकेने शिवाजी पार्क मैदानात सोयी सुविधांची मोठी व्यवस्था केली आहे. सकाळी दहाच्या सुमारास राज्यपाल आणि मुख्यमंत्री चैत्यभूमीवर बाबाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणार आहेत.

#drambedkar- असे होते बाबासाहेबांच्या जिवनातील शेवटचे 6 दिवस

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरमध्ये हजारो भीमअनुयायी जमले आहेत. त्यामुळे दादरला भीमसागराचे रूप आले आहे असं म्हणायला हरकत नाही. शिवाजी पार्कवर यंदा अंथरलेल्या हिरव्या रंगाच्या कापडी जाळीमुळे अनुयायींची धुळीच्या त्रासापासून मुक्तता झाली आहे.

मंगळवारपासूनच हजारो अनुयायी बाबासाहेबांना अभिवादनासाठी चैत्यभूमीवर दाखल आहेत. आजच्या महापरिनिर्वाण दिननिमित्त शिवाजी पार्क मैदानात पालिकेकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे.

महामानवाला अभिवादन करण्यासाठी जमलेल्या हजारो अनुयायांसाठी, सामाजिक संस्था आणि संघटनांनी वैद्यकीय सुविधा आणि भोजन व्यवस्था केलेली आहे. तसंच कडेकोट पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

6 डिसेंबरला चैत्यभूमीकडे येणाऱ्या अनुयायांना सोयीसुविधा देण्यासाठी बेस्टदेखील सज्ज झाली आहे. जादा बस सेवांप्रमाणेच वीजपुरवठा, जनरेटर, प्रथमोपचार, वैद्यकीय मदत केंद्रे आदी सुविधा बेस्टनं उपलब्ध करून दिल्या आहेत.

#drambedkar- साऱ्या देशाला एका भाषेत बोलायला शिकवा मग बघा काय चमत्कार घडतो- आंबेडकर

दादर चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी महापालिका, बेस्टप्रमाणेच रेल्वेनेही तयारी केली आहे. मध्य रेल्वेपाठोपाठ पश्चिम रेल्वेने आज लोकलमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन जादा तिकीट खिडक्यांसह, रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलिसांचा ताफाही तैनात केला आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर परिसरातली वाहतूककोंडी टाळण्यासाठी मुंबईतील महत्त्वाच्या मार्गांवरील वाहतूक व्यवस्था बदलण्यात आली आहे. दादर परिसरातील सर्व फेरीवाल्यांना हटवून महत्त्वाच्या मार्गांवरील पार्किंगला बंदी घालण्यात आली आहे.

VIDEO VIRAL : लाजिरवाणी घटना; वळुला जीवंत जाळण्याचा प्रयत्न

First published: December 6, 2018, 7:15 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading