'कौरव होते टेस्ट ट्यूब बेबी तर रावणाकडे होती 24 विमानं', कुलगुरूंचं अजब विधान

News18 Lokmat | Updated On: Jan 6, 2019 04:17 PM IST

'कौरव होते टेस्ट ट्यूब बेबी तर रावणाकडे होती 24 विमानं', कुलगुरूंचं अजब विधान

नवी दिल्ली : आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू जी नागेश्वर राव यांनी महाभारताविषयी खळबळजनक विधान केलं आहे. ते म्हणाले की, 'कौरव हे टेस्ट ट्यूब बेबी आहेत' त्यावेळी लोक विज्ञानाचा अभ्यास करायचे असं त्यांचं म्हणणं आहे.

जी नागेश्वर राव हे म्हणाले की, 'मी रामायणा आणि महाभारताचा अभ्यास केला आहे. गांधारीने तिच्या जीवनकाळात 100 मुलांना जन्म कसा दिला?' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

"हे शक्य नाही. त्यामुळे कौरव हे टेस्ट ट्यूब बेबीमुळे झाले आहे. " असं अविचारी विधान या कुलगुरूंनी केलं आहे. महाभारत आणि रामायण हा इतिहास आहे, पौराणिक कथा नाही आहे. त्यामुळे त्यावेळीदेखील लोक विज्ञानाचा अभ्यास करायचे असं कुलगुरू म्हणाले आहेत.

Loading...

भारतीय इतिहासासाठी विज्ञान ही काही नवीन गोष्ट नाही आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. पण त्यांच्या या वक्तव्याची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे.

कुलगुरू जी नागेश्वर राव यांनी शुक्रवारी असा दावा केला आहे. भारताने हजारो वर्षांपासून ज्ञान प्राप्त केलं आहे. त्यामुळे हे शक्य असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

बरं इतकंच नाही तर, रावणाकडे फक्त पुष्पक विमानच नाही तर वेगवेगळ्या प्रकाराचे 24 पद्धतीचे विमान असल्याचंही या कुलगुरूंनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 6, 2019 08:11 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...