रस्त्यावरच झाली प्रसूती, दीड तासाने 1100 किमी दूर गावी जाण्यासाठी निघाली चालत

रस्त्यावरच झाली प्रसूती, दीड तासाने 1100 किमी दूर गावी जाण्यासाठी निघाली चालत

प्रसुती झाल्यानंतर महिला दीड तासात पुन्हा गावाच्या दिशेने चालायला लागली. एका चेकपोस्टवर पोलिसांनी पाहताच त्यांना थांबवलं आणि क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल केलं.

  • Share this:

भोपाळ, 13 मे : कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या काळात सरकारकडून लोकांची काळजी घेतली जात असली तरी बऱ्याच जणांना त्रास सहन करावा लागला आहे. यात मजुरांचे प्रचंड हाल झाले आहेत. तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये मजुरांसाठी गाड्या, ट्रेन यांची व्यवस्था केल्यानंतरही अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. औरंगाबादमध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर मजुरांचे प्रश्न किती गंभीर आहेत याची जाणीव होत आहे. आता आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. महाराष्ट्रातील नाशिकमधून मध्यप्रदेशातील सतना हे 1100 किमी अंतर चालताना पिंपळगाव इथं एका महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या.

महिलेनं रस्त्यातच मुलाला जन्म दिला. एवढंच नाही तर त्यानंतर दीड तासात महिलेनं पुन्हा चालायला सुरुवात केली. सेंधवा सीमेवर पोलिसांनी त्यांना क्वारंटाइन सेंटरमध्ये नेलं आहे. महिलेची रस्त्यातच प्रसूती झाली त्याबद्दल पतीने सांगितलं की, तिच्या पोटात दुखायला सुरुता झाली. तेव्हा महिलांनी पडदा धरून तीची प्रसूती केली.  त्यानंतर दीड तासाने आम्ही पुन्हा चालत निघालो.

घरी परत जाणाऱ्या या कामगारांपैकी आणखी एकाची पत्नी आठ महिन्यांची गर्भवती आहे. तीसुद्धा नाशिकपासून चालत निघाली आहे. खायला काहीच नाही आणि खर्चाला पैसे नसल्यानं चालत गावी जाण्याचा निर्णय घ्यावा लागला असं मजुरांनी सांगितलं.

हे वाचा : झाडावर मुलाचं शव पाहून आई हादरली; सोलापूरहून 1400 किमी अंतर पार करुन आला होता

सेंधवा ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी व्हीडीएस परिहार यांनी सांगितलं की, जवळपास 15 ते 16 मजूर आहेत. त्यांच्यासोबत 8-10 लहान मुलं आहेत. महाराष्ट्रातून आलेल्या या लोकांमध्ये एका महिलेची प्रसुती नाशिक ते धुळे यादरम्यान झाली. महिलांनी रस्त्यावरच प्रसूती केली. त्यानंत पुन्हा ते चालत निघाले. जेव्हा पोलिसांना पाहिलं तेव्हा ते पळून जात होते. शेवटी त्यांना समजावून सांगितलं आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्वांना पोहोचवण्यासाठी बसची व्यवस्था केली जात आहे.

हे वाचा : लेकीसाठी बापाने तयार केला गाडा, गर्भवती पत्नीसह 800 किमी चालत पोहोचले गावी

First published: May 13, 2020, 7:27 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading