'टिक टॉक'वरील बंदी उठवली, अॅपला मद्रास हायकोर्टाची सशर्त परवानगी!

'टिक टॉक'वरील बंदी उठवली, अॅपला मद्रास हायकोर्टाची सशर्त परवानगी!

सोशल मीडियावर सध्या तुफान लोकप्रिय असलेल्या टिक टॉक या मोबाईल व्हिडिओ अॅपवर बंदी मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने उठवली आहे.

  • Share this:

चेन्नई, 24 एप्रिल: सोशल मीडियावर सध्या तुफान लोकप्रिय असलेल्या टिक टॉक या मोबाईल व्हिडिओ अॅपवर बंदी मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने उठवली आहे. न्यायालयाने या अॅपला सशर्त परवानगी दिली आहे. ही परवानगी देताना न्यायालयाने ट्रायला आक्षेपार्ह मजकूराबाबत नियमावली तयार करण्याचे आदेश दिले आहेत. याआधी मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने अॅपवर बंदी घालण्याचे आदेश 4 एप्रिल रोजी केंद्र सरकारला दिले होते. अॅपवरील बंदीनंतर त्याचा मोठा फटका टिक टॉक अॅपला बसला होता.

टिक टॉक अॅपवर मोठ्या प्रमाणात अश्लील व्हिडिओ असल्याने कोर्टाने या अॅपवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. टॉक टॉक हे चीनमधील एका कंपनीचे अॅप असून सध्या ते भारतात प्रचंड लोकप्रिय आहे. या अॅपवर मोठ्या प्रमाणात अश्लील व्हिडिओ असून त्यामुळे देशातील संस्कृती खराब होत असल्याचे सांगत एक याचिका दाखल करण्यात आली होती.

या गोष्टी तुम्हाला माहित आहेत?

टीकटॉकचं सुरूवातीचं नाव हे musically असं होतं. त्यानंतर त्याचं नाव बदलून टीकटॉक असं ठेवलं गेलं. एका रिपोर्टनुसार जवळपास 100 कोटीपेक्षा देखील जास्त लोकांनी या अ‍ॅपला डाऊनलोड केलं आहे. स्टार्टअपमध्ये सर्वाधिक स्टार्ट अप किंमत असेलेली कंपनी अशी टीकटॉकची ओळख आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

टिक टॉक हे चीनमधील Bytedance Technology या कंपनीचे अ‍ॅप असून सध्या ते भारतात प्रचंड लोकप्रिय आहे. या अ‍ॅपवर मोठ्या प्रमाणात अश्लील व्हिडीओ बनवण्यात येत असून त्यामुळे देशातील संस्कृतीवर परिणाम होत असल्याचे सांगत याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेत टिक-टॉकवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. यावरील सुनावणीदरम्यान न्यायालयानं बंदीचा आदेश दिला होता.

टिक टॉक अ‍ॅपच्या मदतीने काही सेकंद/मिनिटांचे व्हिडीओ तयार करून त्याला स्पेशल इफेक्ट देतात येतात. याची प्रचंड क्रेझ सध्या सोशल मीडियावर आहे.

VIDEO : अलादीनचा चिराग सापडला तर कोणत्या इच्छा पूर्ण करणार? मोदी म्हणाले...

First published: April 24, 2019, 7:24 PM IST

ताज्या बातम्या