पलक्कड 8 फेब्रुवारी: केरळच्या पलक्कडमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. मदरसामधील एका 30 वर्षीय महिला शिक्षिकेनं स्वतःच्याच सहा वर्षांच्या मुलाची गळा कापून हत्या (Murder) केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही महिला गर्भवती आहे. तिनं पोलिसांना (Police) सांगितलं, की अल्लाहला खूश करण्यासाठी तिनं आपल्या मुलीची हत्या करत कुर्बानी दिली.
या घटनेनंतर महिलेनं स्वतःच पोलिसांनी याबद्दलची माहिती दिली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही घटना रविवारी पहाटे 4 वाजता घडली. हत्या करण्यात आलेला मुलगा हा महिलेच्या तीन मुलांमधील सर्वात लहान होता आणि तिच्यासोबतच झोपला होता. महिलेनं रात्रीच मुलाला झोपेतून उठवलं. ती मुलाला वॉशरूमच्या बहाण्यानं घेऊन गेली आणि हत्येच्या आधी त्याचे पाय बांधले. महिलेचा पती आपल्या इतर दोन मुलांसह दुसऱ्या खोलीत झोपला होता.
पोलिसांच्या माहितीनुसार, पुथुपल्लीथिरुवची रहिवासी असलेल्या या महिलेनं आपल्या मुलाची हत्या केल्यानंतर पहाटे 4 च्या सुमारास एमरजेंसी कंट्रोल रुमला फोन करत आपला गुन्हा स्वतःच सांगितला. पोलिसांनी तिनं सांगितलं, की अल्लाहला कुर्बानी म्हणून तिनं आपल्या 6 वर्षांचा मुलगा आमिलची हत्या केली.
शेजाऱ्यांनी माध्यमांना सांगितलं, की घटनेच्या एक दिवस आधीच शाहिदानं आपल्या शेजाऱ्याकडून जनमैत्री पोलीस ठाण्याचा नंबर घेतला होता. पोलिसांनी या मुलाचा मृतदेह बाथरूममध्ये रक्तानं माखलेल्या अवस्थेत मिळाला. त्याचा गळा कापला गेला होता आणि पाय बांधलेले होते आणि शाहिदाच्या हातावरही जखमा होत्या. शाहिदाचा पती काही दिवसांपूर्वीच परदेशातून भारतात परतला आहे. सध्या तो शहरात टॅक्सी ड्रायवर म्हणून काम करतो.
शाहिदाविरोधात पोलीस ठाण्यात हत्येच्या आरोपात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पलक्कडचे पोलीस अधिक्षक आर. विश्वनाथ म्हणाले, की महिलानं पोलिसांना जे काही सांगितलं तेच एफआयआरमध्ये लिहिलं आहे. ही हत्या खरंच अल्लाहला कुर्बानी देण्यासाठी केली, की इतर काही कारणांसाठी याबद्दलचा तपास सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder news