भाजप सरकारकडून मदरसे आणि संस्कृत शाळांवर बंदी!

भाजप सरकारकडून मदरसे आणि संस्कृत शाळांवर बंदी!

धार्मिक शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारची नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे

  • Share this:

गुवाहाटी, 13 फेब्रुवारी : आसाममधील भाजप सरकारने राज्यातील सर्व मदरसे आणि संस्कृत शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या जागांवर सरकार नव्या शाळा सुरू करण्याचा विचार करीत आहे. आसाम राज्याचे शिक्षण मंत्री हिमंत विश्व शर्मा यांनी सांगितले, की अरबी वा अन्य धार्मिक शिक्षा देण्याची जबाबदारी सरकारची नाही. यासाठी आम्ही येत्या 4 ते 5 महिन्यात सरकारद्वारा संचालित असलेल्या मदरशांना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

आसाम सरकारच्या मदरसा शिक्षा बोर्डनुसार राज्य सरकारद्वारा संचालित तब्बल 612 मदरसे आहेत. या मदरशांमध्ये इस्लामिक शिक्षा देण्याबरोबरच अन्य विषय शिकवले जातात. मदरशांसह सरकारने सरकारी अनुदानावर सुरू असलेल्या 101 संस्कृत शाळाही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या संस्कृत शाळांमध्ये वैदिक शिक्षेबरोबरच अन्य विषयांचेही प्रशिक्षण दिलं जातं.

या मदरसे आणि संस्कृत शाळांच्या ऐवजी 10 वी आणि 12 वीसाठी नव्या शाळा सुरू केल्या जातील. मंत्र्यांनी सांगितले की, सरकारला खासगी मदरसे आणि संस्कृत शाळांपासून काहीच आपत्ती नाही. याशिवाय ते म्हणाले, निवृत्तीपर्यंत या शाळेच्या शिक्षकांना वेतन मिळत राहिलं, मात्र ते कोणतेही वर्ग घेऊ शकणार नाही.

यापूर्वी मे 2017 मध्ये हिमंत विश्व शर्माने एक निर्णय घेतला होता, ज्यानुसार राज्यातील सर्व मदरसे आणि संस्कृत शाळांमध्ये कम्प्युटरचे प्रशिक्षण दिले जाईल.

अन्य बातम्या

कोरोनापासून वाचवा! जपानच्या शीपमध्ये अडकलेल्या मुंबईच्या तरुणीचं सरकारला आवाहन

गार्गी कॉलेज सामूहिक विनयभंग प्रकरणात 10 जणांना अटक, सीबीआय तपासाची मागणी

First published: February 13, 2020, 12:12 PM IST
Tags: sanskruti

ताज्या बातम्या