गर्भपात करण्याचा कालावधी 24 आठवडे करा- उच्च न्यायालय

गर्भपात करण्याचा कालावधी 24 आठवडे करा- उच्च न्यायालय

मद्रास उच्च न्यायालयाने सरकारला गर्भपातासंदर्भातील कायद्यात बदल करण्यास सांगितले आहे.

  • Share this:

चेन्नई, 25 एप्रिल: मद्रास उच्च न्यायालयाने सरकारला गर्भपातासंदर्भातील कायद्यात बदल करण्यास सांगितले आहे.  याबाबत कोर्टाने सुमोटो घेत केंद्र सरकारला मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी अॅक्ट, 1971मध्ये बदल करण्यास सांगितले. गर्भपात करण्याचा अधिकृत कालावधी 20 आठवड्यांवरून 24 आठवडे करण्यात यावा असे कोर्टाने म्हटले आहे.

देशात प्रत्येक वर्षी 17 लाख मुले कोणत्याना कोणत्या व्यंगासह जन्माला येतात. त्यामुळेच गर्भपात करण्याचा कालावधी 20 आठवड्यांवरून 24 आठवडे करण्यात यावा. गर्भपात कायद्यात बदल करण्याचा प्रस्ताव 2014मध्ये देण्यात आला होता. या प्रस्तावात महिलांना होणाऱ्या त्रासाचा देखील उल्लेख करण्यात आला होता. सध्या कायद्यानुसार गर्भपात करण्याचा कालावधी 20 आठवडे आहे. गर्भपात करण्याचा कालावधी 20 आठवडे असल्यामुळे ग्रामीण भागात असुरक्षित गर्भपात करण्याचे प्रमाण वाढत आहे. सुनावणी दरम्यान कोर्टाने अशा महिलांचा देखील उल्लेख केला ज्यांच्यावर बलात्कारासारख्या घटना होतात.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात प्रत्येक वर्षी 17 लाख मुले व्यंगासह जन्माला येतात. जर गर्भपात कायद्यात बदल केला तर हे प्रमाण कमी होऊ शकते असे अहवालात म्हटले आहे. यासंदर्भात डॉक्टरांनी देखील मान्य केले आहे की 20 आठवड्यांपेक्षा कमी कालावधीचे गर्भ असल्यास त्यावर उपचार करणे शक्य नसते. उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला यासंदर्भात दोन महिन्यात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

यासंदर्भातच मुंबई उच्च न्यायालयाने ४ एप्रिल रोजी एक ऐतिहासिक निकाल दिला होता. या निर्णयानुसार आईच्या जीवाला धोका असेल तर 20 आठवड्यांनंतर गर्भपात करायला कोर्टाची परवानगी मागायची आवश्यकता नाही, असं कोर्टाने म्हटले होते. भारतात 20 आठवड्यापेक्षा जास्त गर्भ असेल तर गर्भपात करता येत नाही. गुन्हा नोंदवला जातो. गरोदरपणात नंतरच्या काळात काही गुंतागुंत निर्माण झाली, तर आईचा जीव वाचवण्यासाठी काही वेळा गर्भपात करण्याची वेळ येते. पण डॉक्टरांना हा निर्णय घेण्याअगोदर कोर्टाची परवानगी घ्यावी लागते.

पोलिसाने तरुणाला प्लास्टिकच्या पाईपने झोडपले VIDEO VIRAL

First published: April 25, 2019, 9:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading