Home /News /national /

Lockdown : इंटरनेट रिचार्ज करण्यासाठी आईनं दिला नकार, मलानं उचललं टोकाचं पाऊल

Lockdown : इंटरनेट रिचार्ज करण्यासाठी आईनं दिला नकार, मलानं उचललं टोकाचं पाऊल

नीरजच्या आईनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार नीरज 3 महिन्यांचा डेटा पॅक रिचार्ज करण्यासाठी हट्ट धरून बसला होता.

    भोपाळ, 24 मे : पब्जी खेळण्यासाठी हवा असलेला इंटरनेट पॅक मारण्यासाठी नकार दिल्यानं तरुणानं रागातून धक्कादायक पाऊल उचललं आहे. मध्ये प्रदेशातील भोपाळमध्ये ही घटना घडली आहे. या मुलाला सतत पब्जी खेळण्याचा नाद होता. रात्री उशिरापर्यंत पब्जी खेळायचा घरातल्यांसोबत बोलायचा नाही. इंटरनेट रिचार्ज मारण्यासाठी आईनं नकार दिल्यानं ह्या तरुणानं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बागसेवनिया (Bagsevania) भागात नीरज कुशवाह नावाचा हा तरुण राहात होता. त्याचे वडील आणि छोटा भाऊ सकाळी दुकानावर गेले. त्यानंतर आईसोबत वाद झाल्यानं त्यानं हे धक्कादायक पाऊल उचललं आई सगळं काम आवरून दुपारी डबा देण्यासाठी दुकानावर गेली असताना नीरजनं रागातून गळफास लावून आत्महत्या केली. आई घरी आल्यानंतर तिनं हा सगळा प्रकार पाहिला. तिने नीरजला फासावरून खाली उतरवलं आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. हे वाचा-अखेर आली कोरोनाची एक्सपायरी डेट, सिंगापूरच्या शास्त्रज्ञांनी सांगितली तारीख नीरजच्या आईनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार नीरज 3 महिन्यांचा डेटा पॅक रिचार्ज करण्यासाठी हट्ट धरून बसला होता. त्यावेळी आईनं 1 महिन्याचं कर असं सांगितल्यानंतर दोघांमध्ये खूप मोठा वाद झाला. नीरजनं काहीही न ऐकून घेता वाद घालायला सुरुवात केली. डोक्यात राग घालून इतक्या टोकाचं पाऊल उचलेल असं वाटलं नव्हतं असं आईनं पोलिसांना माहिती दिली आहे. हे वाचा-मुंबईतून धक्कादायक बातमी, शवगृहातील 3 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण हे वाचा-कोरोनाव्हायरसवर उपचारासाठी औषधांपेक्षाही चहा प्रभावी; तज्ज्ञांचा दावा संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Madhya pradesh

    पुढील बातम्या