मराठी बातम्या /बातम्या /देश /

भयंकर! पाठीत घुसला होता सुरा, रक्तबंबाळ अवस्थेत उभा होता तरुण; पोलिसांनी पाहिलं पण...

भयंकर! पाठीत घुसला होता सुरा, रक्तबंबाळ अवस्थेत उभा होता तरुण; पोलिसांनी पाहिलं पण...

आता हे प्रकरण समोर आल्यानंतर लोकांनी पोलिसांच्या वागणुकीचा निषेध केला आहे.

आता हे प्रकरण समोर आल्यानंतर लोकांनी पोलिसांच्या वागणुकीचा निषेध केला आहे.

आता हे प्रकरण समोर आल्यानंतर लोकांनी पोलिसांच्या वागणुकीचा निषेध केला आहे.

    जबलपूर, 18 ऑक्टोबर : मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये पोलिसांच्या क्रौर्याचा घटना समोर आली आहे. येथील एका पोलीस ठाण्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाला रिपोर्ट नोंदवण्यासाठी तासन् तास उभे रहावे लागले. त्याचवेळी पोलीस तक्रार लिहिण्याऐवजी वेगळीच कामं करत होते. जखमी तरूण विहळत असूनही पोलिसांनी वेळीच त्याच्यावर उपचार केले नाही आणि रिपोर्ट लिहिण्याच्या नावाखाली त्याला पोलीस ठाण्यात उभे केले. मिळालेल्या माहितीनुसार, युवकावर चाकूनं वार करण्यात आला होता. पाठीवर चाकू लटकवलेल्या अवस्थेतच हा मुलगा पोलीस स्टेशनमध्ये उभा होता. विशेष गोष्ट अशी आहे की इतकी गंभीर बाब असूनही पोलिसांनी त्यांला रुग्णालयात दाखल केले नाही, त्याऐवजी त्यांनी त्याला पोलीस स्टेशनमध्ये उभे केले. वाचा-भयंकर! TVमुळे भाऊ झाला वैरी! लहान बहिणीच्या डोक्यात घातला हातोडा पोलिसांच्या या क्रौर्याचा निषेध आता हे प्रकरण समोर आल्यानंतर लोकांनी पोलिसांच्या वागणुकीचा निषेध केला आहे. लोकांनी सांगितले की, अशा परिस्थितीत पोलिसांनी प्रथम जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले पाहिजे होते. रुग्णालयातही रिपोर्ट लिहिता आला असता. तर काहींनी जखमी उपस्थित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. वाचा-धक्कादायक! क्षुल्लक कारणावरून झाला वाद; बेदम मारहाण करत महिलेची जीभच छाटली वादातून तरुणांनी भोसकला चाकू मीडिया रिपोर्टनुसार जखमी झालेल्या युवकाचे नाव सोनू आहे. त्याच्या घराजवळ मद्यपान करणार्‍या गोलू या युवकाशी वाद झाला. दरम्यान, शुक्रवारी रात्री घराबाहेर फिरत असलेल्या आरोपी गोलूने त्याच्या साथीदारांसह चाकूने हल्ला केला. दरम्यान सोनूच्या पाठीवर चाकू भोसकला. हा आवाज ऐकून सोनूचे कुटुंबिय व परिसरातील इतर लोक जमले, त्यानंतर आरोपी तेथून पळून गेला. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदविली असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Crime news

    पुढील बातम्या