दात दुखत होता म्हणून गेला डॉक्टरकडे, 8 दिवसांनी नावावर झाला वर्ल्ड रेकॉर्ड

दात दुखत होता म्हणून गेला डॉक्टरकडे, 8 दिवसांनी नावावर झाला वर्ल्ड रेकॉर्ड

एका दाताने केला वर्ल्ड रेकॉर्ड, जर्मनीच्या डॉक्टरांना मागे टाकणार मध्य प्रदेशचे सुप्रसिद्ध डॉक्टर.

  • Share this:

मध्य प्रदेश, 05 मार्च : उपचारासाठी डॉक्टरकडे गेल्यानंतर रुग्णाच्या नावावर रेकॉर्ड झाल्याची बातमी तुम्ही कधीच वाचली नसेल. मात्र असा प्रकार घडला आहे. मध्य प्रदेशातील खरगोन येथे अभियांत्रिकी करणाऱ्या विद्यार्थ्याच्या जबड्यातून डॉक्टरांनी असं काही काढलं की त्याच्या नावावर एका रेकॉर्डची नोंद झाली आहे.

गेले अनेक वर्षांपासून दात दुखत असल्यामुळं हा मुलगा अखेर डॉक्टरकडे गेला. त्यावेळी डॉक्टरांनी चक्क 39 मिमी लांबीचा दात बाहेर काढला. हा जगातील सर्वात लांब मानवी दात असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे.

वाचा-आता कुत्रा करणार मतदान! निवडणूक आयोगानं काढलेल्या ओळखपत्राचा Photo Viral

खरगोनचे डेंटिस्ट सौरभ श्रीवास्तव यांनी असा दावा केला आहे की, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या दाताची लांबी नोंदवली जाणार आहे. खरगोनमध्ये सध्या या तरुणाच्या दाताची चर्चा आहे. या दाताची लांबी 39 मिलिमीटर आहे असा दावा डॉ. सौरभ यांनी केला आहे. हे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलेल्या 37.3 मिलीमीटर लांबीच्या दातपेक्षा मोठा आहे.

वाचा-महिलेची दादागिरी, हॉर्न वाजवत होता म्हणून बस ड्रायव्हरला केली बेदम मारहाण

2019 साली गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जर्मनीच्या दंतचिकित्सक मॅक्स ल्यूक्सने सर्वात लांब दात काढण्याचा विक्रम केला आहे. वर्ल्ड रेकॉर्ड झालेल्या दाताची लांबी 37.2 मिमी होती. मात्र सौरभ यांनी 39 मिमी लांबीचा दात हा रेकॉर्ड मोडेल असे सांगितले आहे.

वाचा-‘खोटं-खोटं तरी रड’ पाठवणीवेळी आईचा नवरीला सल्ला, VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

वडोदरा (गुजरात) येथील डॉ. जामीन पटेल यांचे 36.7 मिमी लांबीचे दात काढण्याचा विक्रम गेल्या वर्षी डॉ. मॅक्स ल्यूक्स यांनी मोडला. आता जर्मनीच्या डॉक्टर लुक्सच्या विक्रमाचा दावा मध्य प्रदेशातील खारगोन जिल्ह्यातील डॉ. सौरभ श्रीवास्तव यांनी केला आहे.

वाचा-TikTokवर आलं आणखी एक भयंकर चॅलेंज, दिसायला मजेशीर पण घेऊ शकतो तुमचा जीव

29 फेब्रुवारीला 20 वर्षीय पवन भावसार हा अभियांत्रिकीचा विद्यार्थी डॉक्टर सौरभ श्रीवास्तव यांच्या दवाखान्यात आला होता. पवनने 8 दिवसांपूर्वी दात काढला होता. त्या दातांची लांबी 36 मिमी होती. तर काही दिवसांनी पुन्हा दात काढल्यानंतर सौरभ यांनी दुसरा दात काढला. या दाताची उंची 39 मिमी होती. आता डॉक्टर सौरभ श्रीवास्तव असा दावा करीत आहेत की 39 मिमीचा हा दात जगातील सर्वात लांब दात आहे. ते जागतिक रेकॉर्डमध्ये त्याचे नाव नोंदवतील. त्यामुळं सध्या मध्य प्रदेशमध्ये फक्त या दाताची चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 5, 2020 03:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading