शिपूर, 01 मार्च : एक, दोन नाही तर तब्बल सहा शिशुंना 23 वर्षीय महिलेनं जन्म दिल्याची घटना मध्य प्रदेशातील शिपूर इथे घडली आहे. शनिवारी 23 वर्षीय महिलेनं 35 मिनिटांमध्ये तब्बल 6 नवजात बालकांना जन्म दिला. मात्र जन्मानंतर काही मिनिटांत दुर्दैवानं 5 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. तर एका शिशुची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शिपूर जिल्ह्यातील रुग्णालयात ही घटना घडली आहे. मूर्ती सुमन यांना प्रसूतीच्या कळा येऊ लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी सोनोग्राफी केली असता एक दोन नाही तर पोटात 6 शिशु असल्याचं सांगितलं. प्रसूती विशेष तज्ज्ञ बी.एल यादव यांनी या महिलेची प्रसूती सर्जरी न करता नॉर्मल करायची असं सांगितलं त्यानुसार या महिलेची प्रसूती नॉर्मल करण्यात आली. यावेळी महिलेनं 35 मिनिटांत 6 शिशुंना जन्म दिला आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या नवजात शिशुंमध्ये चार मुलं आणि 2 मुली होत्या. सगळी मुलं वजनाला अत्यंत कमी होते. प्रसूतीनंतर काही वेळातच त्यातील 5 मुलांचा मृत्यू झाला तर एकाची प्रकृती गंभीर आहे.
आतापर्यंत एकावेळी जुळी किंवा तिळी मुलं होतात असं आपण ऐकलं होतं. मात्र अशा प्रकारे एकापाठोपाठ सहा मुलांना या महिलेनं जन्म दिला आहे. अशा पद्धतीची घटना मे 2019 रोजी पोलंडमध्ये घडली होती.एका महिलेने एकाच वेळी सहा मुलांना जन्म दिला होता. त्यामध्ये चार मुली आणि दोन मुलं आहेत. गर्भधारणेच्या 29 व्या आठवड्यात या मुलांचा जन्म झाला होता.
हे वाचा-वाढत्या महागाईचा परिणाम, घटस्फोटित महिलेच्या पोटगीत दरवर्षी 10 टक्क्यांनी वाढ
हे वाचा-रचला इतिहास! महाराष्ट्राच्या डॉ. माधुरी कानिटकर लेफ्टनंट जनरल पदी
Published by:Kranti Kanetkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.