भोपाळ, 15 डिसेंबर : मला कार (car) चालवायचीच आहे, ड्रायव्हिंग येत असो किंवा नसो प्रत्येक गर्लफ्रेंड किंवा बायको आपला बॉयफ्रेंड किवा नवऱ्याकडे असा हट्ट करतेच. तेदेखील तिच्या हट्टासमोर हार मानतात आणि तिचा हट्ट पुरवतात. असाच होणाऱ्या बायकोचा ड्रायव्हिंगचा (driving) हट्ट पुरवणं मध्य प्रदेशातील (madhya pradesh) एका तरुणाला चांगलाच महागात पडला आहे.
इंदोरच्या राजीव गांधी चौकात मंगळवारी दुपारी एका भरधाव कारनं तीन रिक्षांना (auto) धडक दिली. ही कार घमंडी लस्सी शॉपच्या मालकाच्या होणारी सून चालवत होती अशी माहिती मिळते आहे. वासुदेव आहुजा यांचा मुलगा आशिष आहुजा आणि त्याची होणारी बायको जागृती कारमधून जात होते. 100 पेक्षाही जास्त वेगात ही कार होती. ती थेट बॅरिकेट्स तोडून पलीकडे उभ्या असलेल्या रिक्षांना धडकली. एकामागोमाग तीन रिक्षांना धडक बसली.
मध्य प्रदेशमध्ये एका तरुणीनं कार चालवताना ब्रेकऐवजी एक्सिलेटर दाबलं आणि भरधाव कार लागोपाठ तीन रिक्षांना धडकली. pic.twitter.com/MNUyBn7bKI
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा कार रिक्षाला धडकली तेव्हा तरुणी घाबरली आणि तिनं सीटची अदलाबदल केली. आपल्या होणाऱ्या नवऱ्याला तिनं आपल्या सीटवर बसवलं आणि ती त्याच्या सीटवर बसली. पोलीस ठाण्यातही आशिष आपणच कार चालवत असल्याचं सांगत होता. मात्र प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या जबाबानुसार कार जागृती चालवत होती.
प्रत्यक्षदर्शीनं दिलेल्या माहितीनुसार एक तरुणी भरधाव वेगानं कार चालवत होती. एकापाठोपाठ तीन रिक्षांना कारनं धडक दिली. त्यानंतर ऑटो उडून रस्त्याच्या कडेला फेकली गेली. त्यातील लोक जवळपास 10 फूट उंच उडून जमिनीवर कोसळले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
जागृतीला नीट ड्रायव्हिंग येत नव्हतं. तिनं चुकून ब्रेकऐवजी एक्सिलेटरवर पाय ठेवला आणि कार शंभरपेक्षा अधिक स्पीडनं गेली आणि कारवरील नियंत्रण सुटलं, असं मानलं जातं आहे.
दैनिक भास्करच्या वृत्तानुसार राजेंद्र नगर टीआई अमृता सोलंकी यांनी सांगितलं, चोइथराम बाजाराजवळ फॉरच्युनर कारनं (MP09 NR0054) तीन ऑटोला टक्कर दिली आहे. यात पाच जण जखमी झाले आहेत. कार एक महिला चालवत होती. ती नशेत नव्हती मात्र तिनं ब्रेकऐवजी एक्सेलेटर दाबलं. आरटीओ रजिस्ट्रेशनुसार ही कार ग्लोबल सिटी प्राइव्हेट लिमिटेड नावानं रजिस्टर आहे.