जबलपूरजवळ पनागर परिसरात एक अनोख घर पाहायला मिळालं. काही लोकांनी तर या घराला tree house असंही नाव दिलं आहे. या घराचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
आपलं खरं सुंदर आणि छान असावं असं प्रत्येकाला वाटत असतं पण एक पिंपळाचं झाड वाचवण्यासाठी या व्यक्तीनं काय केलंय पाहा.
या तरुणाच्या घराला ट्री हाऊस असंही अनेक जण म्हणतात. याचं कारणही तेवढंच खास आहे. 126 वर्ष जुनं पिंपळाचं झाड वाचवण्यासाठी या व्यक्तीनं झाडाला न कापता आपलं घर बांधलं आहे.
या घराला पाहून अनेकांना प्रश्न पडला आहे घरात झाड आहे की झाडावर घर. हे घर डॉ मोतीलाल केशरवानी यांचं आहे. 28 वर्षांपूर्वी त्यांनी हे घर आपल्या मित्राच्या मदतीनं बांधलं.तेव्हापासून हे झाडं आजपर्यंत सुरक्षित आहे. याला कोणीही धक्का लावू शकलं नाही.
पर्यावरण संरक्षणाबरोबरच पिंपळाच्या झाडालाही आध्यात्मिक महत्त्व आहे. पिंपळाच्या झाडामध्ये 33 कोटी देव असतात असंही म्हटलं जातं याशिवाय त्याच्यापासून सर्वाधिक ऑक्सिजनही मिळतो.
पर्यावरण वाचवण्याच्या हेतू हे घर झाड न तोडता बांधण्यात आलं आहे. आताही या झाडाच्या फांद्या घरातून निघताना पाहायला मिळतात. या घराची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे.
Published by:Kranti Kanetkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.