दिंडोरी, 24 नोव्हेंबर : गाय किंवा बैल एकमेकांना भिडले त्यांच्या रागाच्या भरात नुकसान झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तहसील कार्यालयासमोर दोन बैलांची झुंज रंगली. बाजारपेठेत या बैलांनी उच्छाद मांडला होता. दोन बैलांमध्ये झालेल्या वादातून बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालं आहे.
मध्य प्रदेशातील दिंडरी इथे तहसील कार्यालयाबाहेर दोन बैलांनी अक्षरश: हैदोस घातला होता. या बैलांची झुंज रंगलेली पाहून परिसरात मोठी खळबळ उडाली होती. दिंडोरीमध्ये दोन बैलांना जबरदस्त राग आला. त्यामुळे बाजारपेठेत गोंधळ उडाला. सुमारे एक तास बैलांची झुंज चालू होती.
याआधी देखील अशा प्रकारच्या घटनांमध्ये बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. काही दिवसांपूर्वी बैलांच्या झुंजीमध्ये एक तरुण देखील जखमी झाला होता. बाजापेठेत बैलांचा वाढत जाणारा हा उच्छाद थांबवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे.