Home /News /national /

धक्कादायक! पावती फाडण्याइतकेही पत्नीजवळ नव्हते पैसे, रुग्णालयाबाहेरच पतीचा मृत्यू

धक्कादायक! पावती फाडण्याइतकेही पत्नीजवळ नव्हते पैसे, रुग्णालयाबाहेरच पतीचा मृत्यू

रुग्णालयात भरती करण्यासाठी प्रशासनानं आधी पैसे भरण्यास सांगितले मात्र पैसे नसल्यानं मोठी गैरसोय झाली.

    भोपाळ, 25 जुलै: देशात कोरोनाचं थैमान सुरू आहे. काही रुग्ण अजूनही उपचारापासून वंचित राहात असल्याचं पाहायला मिळालं आहे. मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. रुग्णालयाबाहेर उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पावती न फाडल्यानं रुग्णालयानं उपचार करण्यासाठी नकार दिल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. रात्रभर रुग्ण उपचारासाठी रुग्णालयाबाहेर बसून होता मात्र त्यावर कोणतेही उपचार करण्यात आले नाहीत. सकाळी या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पावती फाडण्यासाठी रुग्णालय प्रशासन अडून दाखवत असल्यानं हा सगळा प्रकार घडल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकाने केला आहे. सुनील धाकड यांनी टीबीचा आजार होता. उपचारासाठी पुरेसे पैसे नसल्यानं पावती तयार करता आली नाही. त्यामुळे रात्रभर रुग्णालयाबाहेर बसून होते. पत्नी आणि सुनील यांनी उपचारासाठी मदत मागितली मात्र पावती तयार केल्याशिवाय रुग्णालयात उपचार मिळत नसल्यानं रात्रभर तिथेच थांबून राहिले. सकाळी सुनील यांचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली. हे वाचा-17 वर्षीय तरुणीची डोक्यात दगड घालून हत्या, विवस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह रुग्णालयात भरती करण्यासाठी प्रशासनानं आधी पैसे भरण्यास सांगितले मात्र पैसे नसल्यानं मोठी गैरसोय झाली. त्यामुळे पतीला रुग्णालयात उपचार देखील मिळू शकले नाहीत. रुग्णालय प्रशासनाच्या निष्ठूरपणाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. उपचार न मिळाल्यानं रुग्णालयाबाहेर सुनील यांचा मृत्यू झाल्यानं मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालयावर रोष व्यक्त केला आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms, Madhya pradesh

    पुढील बातम्या