पाच राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले, ११ डिसेंबरला फैसला

पाच राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले, ११ डिसेंबरला फैसला

आजपासून मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि मिझोरममध्ये आजपासून आचार संहिता लागू करण्यात येत आहे

  • Share this:

नवी दिल्ली, ०६ ऑक्टोबर २०१८- मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणा या पाचही राज्यांत विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून नोव्हेंबरपासून वेगवेगळ्या राज्यातील निवडणुकांना सुरूवात होणार आहे. आयुक्त ओपी रावत यांनी नुकतीच नवी दिल्ली येथे एक पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत रावत म्हणाले की, आजपासून मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि मिझोरममध्ये आजपासून आचार संहिता लागू करण्यात येत आहे. या चारही राज्यांतील निवडणुकांची प्रक्रिया १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल.

छत्तीसगडमधील निवडणुका या दोन टप्प्यात होईल. पहिल्या टप्प्यातील मतदान हे नक्षग्रलस्त परिसरातील १८ जागांसाठी १२ नोव्हेंबरला होईल. तर इतर जागांचे मतदान हे २० नोव्हेंबरला होणार आहे. मध्य प्रदेशमधील २३० जागांसाठी आणि मिझोरच्या ४० जागांसाठी एकाच दिवशी २८ नोव्हेंबरला एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. मध्यप्रदेश आणि मिझोरमप्रमाणे तेलंगणा आणि राजस्थानमध्येही एकाच टप्प्यात निवडणुका होतील. राजस्थानमध्ये ७ डिसेंबरला मतदान होईल. ११ डिसेंबरला पाचही राज्यांची मतमोजणी होईल.

तेलंगणामध्ये पुढच्या वर्षी निवडणुका होणार होत्या. मात्र, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी वेळेआधीच विधानसभा बरखास्त केली. ज्यामुळे तेलंगणामध्ये विधानसभेच्या ठरलेल्या वेळेआधीच निवडणुका होतील. पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकांआधी या पाच राज्यांतील निवडणुका अतिशय महत्त्वाच्या आहेत. या निवडणुकांमध्ये लागणाऱ्या निर्णयांचा परिणाम पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये पाहायला मिळणार आहे. आता मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये भाजपची सत्ता आहे. तर मिजोरममध्ये काँग्रेसची सत्ता आहे. तर तेलंगणामध्ये तेलंगणा राष्ट्र समितीचं सरकार आहे.

गडकरी म्हणतात, 'पवारसाहेब कधी काय बोलतील आणि काय करतील याचा नेम नाही'

First published: October 6, 2018, 3:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading