ती जळत होती; निगरगट्ट पोलीस 3 तास पाहत उभे होते!

ती जळत होती; निगरगट्ट पोलीस 3 तास पाहत उभे होते!

असंवेदनशीलता किती भयानक असू शकते हे दाखवणाही एक घटना उघडकीस आली आहे.

  • Share this:

मंदसौर, 06 ऑक्टोबर: असंवेदनशीलता किती भयानक असू शकते हे दाखवणाही एक घटना उघडकीस आली आहे. एका 22 वर्षाच्या विवाहितेने रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली ते काही वेळातच घटनास्थळी पोहोचले देखील. पण तिला वाचवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी पोलीस बाहेरच थांबले आणि तब्बल 3 तासानंतर एफएसएल पथक आले आणि आग विझवण्यात आली.

पोलीस यंत्रणा निगरगट्ट आणि असंवेदनशील हे सिद्ध करणारी घटना मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा पोलिसांची असंवेदनशीलता समोर आली. एका 22 वर्षीय विवाहीत महिलेने रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घटनेचे वृत्त कळताच पोलिस काही क्षणातच पोहोचले. पण विवाहीतेला वाचवण्याचे सोडून पोलिस घराबाहेरच थांबले. पोलिसांनी तिला वाचवण्याचे कोणतेही प्रयत्न केले नाही. धक्कादायक म्हणजे संबंधित महिलेच्या वडिलांना देखील तिला वाचवण्यासाठी जाऊ दिले नाही.

तब्बल 3 तासानंतर एफएसएल पथकातील अधिकारी आले आणि त्यांनी आग विझवले. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. मला जेव्हा घटनेची माहिती मिळाली तेव्हा मी तातडीने घरी पोहोचलो. पोलिस तेथे उपस्थित होते. पण ते काहीच करत नव्हते. त्यांनी मलाही काही करू दिले नाही, असे विवाहितेचे वडील कोमल टेलर यांनी सांगितले. पोलिसांनी योग्य वेळीच प्रयत्न केले असते तर माझी मुलगी वाचली असती असे ते म्हणाले.

या घटनेबद्दल बोलताना शेजारी असलेल्या शैलेंद्र सोनी यांनी सांगितले, पोलिस आले आणि घराची काच तोडली पण आग विझवण्यासाठी त्यांनी काहीच केले नाही. पोलिसांनी गावातील लोकांना आणि कुटुंबातील लोकांना बाजूला केले होते. तब्बल 3 तासानंतर महिला अधिकारी आल्यानंतर त्यांनी आग विझवलीय. योग्य वेळी आग विझवली असली तर तिला वाचवता आले असते, असे सोनी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 6, 2019 02:27 PM IST

ताज्या बातम्या