लव्ह स्टोरीचा अंत ! संशयातून पत्नीची हत्या केल्यानंतर पतीनंही केली आत्महत्या

लव्ह स्टोरीचा अंत ! संशयातून पत्नीची हत्या केल्यानंतर पतीनंही केली आत्महत्या

संशयामुळे एका प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत झाला आहे. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय घेत पतीनं तिची दगडानं ठेचून निर्घृण हत्या केली.

  • Share this:

भोपाळ, 13 जुलै : संशयामुळे एका प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत झाला आहे. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय घेत पतीनं तिची दगडानं ठेचून निर्घृण हत्या केली. यानंतर त्यानं स्वतःलाही गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. राम सुमिरन आणि शीला यादव असं मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याचं नाव आहे. काही वर्षांपूर्वी या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. विशेष म्हणजे हे लग्न आंतर जातीय होतं. लग्नाच्या काही वर्षांनंतर दोघांमध्येही वाद होऊ लागले आणि शुक्रवारी (12 जुलै ) यांच्या प्रेमाचा अंत झाला. मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना आहे.

(पाहा :VIDEO : विधानसभेसाठी वंचित आघाडी लागली कामाला, काँग्रेससोबत होणार आघाडी?)

मिळालेल्या माहितीनुसार, राम आणि त्याची पत्नी शीला विंध्य नगर परिसरात राहत होते. या दोघांचंही काही वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर या दोघांमध्येही वाद होऊ लागले. शुक्रवारी हे वाद इतके विकोपाला गेले की त्यांच्या नात्याचा अंत झाला. संशयातून रामनं पत्नी शीलाची दगडानं ठेचून हत्या केली.

(पाहा :VIDEO : रस्त्यावर टिक-टॉक व्हिडिओ बनवताय तर पोलीस करू शकता कारवाई!)

यानंतर गळफास घेत त्यानंही आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघांचेही मृतदेह पाहून स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यांना घटनास्थळावरून एक सुसाइड नोटदेखील सापडलं.

(पाहा :VIDEO : पालकांनो, बाळांकडे लक्ष द्या! चिमुरड्याने गिळले नाणे!)

ज्यामध्ये रामनं हत्या आणि आत्महत्येचं कारण लिहिलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून रामनं आधी तिची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःलाही संपवलं. दरम्यान, पोलिसांनी याबाबत कोणतीही माहिती देण्यास टाळलं आहे. याप्रकरणी सध्या कसून चौकशी सुरू आहे.

SPECIAL REPORT : घरासमोर पडला रक्ताचा सडा, शिर्डीत 5 जणांवर कोयत्याने सपासप वार

First published: July 13, 2019, 9:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading