वाचा-"...तर कोरोना रुग्णांना रुग्णालयात उपचार घेण्याची गरज नाही" अनवर शाह याचा 4 जून रोजी कोरोनामुळं मृत्यू झाला. त्यानंतर रतलाममधील आरोग्य विभागानं अनवारच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरू केला. मुख्य म्हणजे या लिस्टमध्ये काही प्रतिष्ठित आणि मोठ्या लोकांचाही समावेश होता. या बाबाच्या संपर्कात आलेल्या 21 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर इतर सर्वांची चाचणी करण्यात आली आहे. या प्रकरणामुळं प्रशासनानं शहरातील जादूटोणा करणाऱ्या बाबांना क्वारंटाइन केलं आहे. वाचा-पावसाळ्यात 5 पट जास्त होणार कोरोनाचा प्रसार! IIT चा भीती वाढवणारा रिसर्च 62 वर्षीय मृत अनवार शाह आपल्या भक्तांना फूंकून पाणी पाजत असत आणि त्यांच्या हातांचा मुका घेत होते, त्यामुळं कोरोनाचा प्रसार आणखी वेगानं झाला. मुख्य म्हणजे रतलाममध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 85वर पोहचला आहे. यात अनवार शाह यांच्या भक्तांनी चिंता वाढवली आहे. त्यामुळं आरोग्य विभागानं लोकांना अशा जादूटोणा करणाऱ्या बाबांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. संपादन, संकलन-प्रियांका गावडे.रतलाम-- नयापुरा के कोरोना संक्रंमित बाबा ने बांटा 21 भक्तो को कोरोना, 29 झाड़-फूक करने वाले बाबाओ को प्रशासन ने किया कोरेंटाईन, 4 जून को हो चुकी है कोरोना संक्रंमित बाबा कि मौत. @manojkhandekar pic.twitter.com/TFwYcy8Ojx
— Sudhir Jain (@SudhirNews18) June 10, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona virus in india