भोपाळ, 02 मे : राजधानी भोपाळ पोलिसाची हत्या केल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका युवकाने घरात घुसून सीआयडी डीएसपी गोरलाल अहिरवार यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. लैंगिक संबंधावरून ही हत्या झाली असल्याचं समोर आलं आहे.
भोपाळच्या अवधपुरी परिसरात हा प्रकार घडला आहे. हिमांशू प्रताप सिंह असं आरोपीचं नाव आहे. सीआयडी डीएसपी गोरेलाल यांचे हिमांशूच्या आईशी असलेल्या अनैतिक संबंधामुळे ही हत्या झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
डीएसपी गोरलाल अहिरवार यांच्या पत्नीचा काही वर्षांआधी मृत्यू झाला होता. त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. हिमांशू सिंह यांच्याशी गोरलाल यांचे कौटुंबीक संबंध होते. हिमांशूच्या घरी गोरलाल यांचं येणं-जाणं असायचं.
या दरम्यान, आपल्या आईशी गोरलाल यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आला. त्यात हिमांशूने आईच्या मोबाईलमध्ये गोरलाल यांनी अश्लील मेसेज पाठवल्याचं पाहिलं होतं. त्यामुळे यावर संतापत हिमांशूने गोरलाल यांची हत्या केली.
हेही वाचा : ..तर मनसेचं 'इंजिन' 'घड्याळा'च्या काट्यावर धावणार!
हत्या करण्यासाठी हिमांशू गोरलाल यांच्या घरी गेला. त्यावेळी त्याच्या आणि गोरलाल यांच्यात वाद झाला. याचवेळी त्यांनी हिमांशूने गोरलाल यांच्यावर गोळ्या झाडल्या. स्थानिकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात नेलं. पण छातीमध्ये गोळी लागल्यामुळे गोरलाल यांचा जागीच मृत्यू झाला.
हत्या करण्यासाठी वापरलेली बंदूक ही अवैध असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर ही बंदूक लपवण्यासाठी हिमांशूला मदत केलेल्या त्याच्या 3 मित्रांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. चेतन, अनिल आणि सुरज अशी त्यांची नावं आहेत.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहेत. तर हिमांशूला हत्येसाठी गावठी कट्टा कुठून मिळाला याचाही पोलीस आता तपास करत आहेत.
VIDEO : इमारतीच्या टोकावर उभा राहून घेत होता सेल्फी, अन्...