पेट्रोल-डिझेल भरा आणि व्हा मालामाल..!!

पेट्रोल-डिझेल भरा आणि व्हा मालामाल..!!

पेट्रोलपंप चालकांनी ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी शक्कल लढवण्यास सुरुवात केलीय. मोफत नाश्ता, लॅपटॉप, चांदीचं नाणं अशा प्रकारच्या या ऑफर्स आहेत.

  • Share this:

भोपाळ, 11 सप्टेंबर : मध्यप्रदेशात पेट्रोलपंप चालकांकडून इंधनाची खरेदी वाढवण्यासाठी ऑफर्सचा पाऊस सुरु आहे. मध्यप्रदेशात महाराष्ट्राच्या तुलनेत पेट्रोल आणि डिझेलवर व्हॅट अधिक असल्यानं इथं इंधन महाग मिळतं. यामुळे अनेक वाहनचालक महाराष्ट्राच्या सीमाभागात कमी दरानं मिळणारं पेट्रोल भरतात. त्यामुळे पेट्रोलपंप चालकांनी ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी शक्कल लढवण्यास सुरुवात केलीय. मोफत नाश्ता, लॅपटॉप, चांदीचं नाणं अशा प्रकारच्या या ऑफर्स आहेत. मध्य प्रदेशात डिझेलवर २२ टक्के तर पेट्रोलवर २७ टक्के व्हॅट लावला जातो.

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज वाढ होत आहे. पेट्रोलचे दर ९० रुपयांच्या पुढे गेले आहेत. मध्य प्रदेशात सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवर सर्वाधिक व्हॅट लावला जातोय. या व्हॅटमुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात आणखी वाढ होत आहे. मध्य प्रदेशात पेट्रोल-डिझेलचे दर जास्त असल्याने राज्यातील ट्रक चालक, टेम्पो आणि जड वाहनधारक तसेच सीमावर्ती भागातील अनेक जण दुसऱ्या राज्यात जावून वाहनांमध्ये पेट्रोल-डिझेल भरत आहेत. हा प्रकार पेट्रोल पंप मालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी विविध क्लुप्त्या वापरायला सुरुवात केली आहे.

शंभर लिटर डिझेल भरल्यानंतर ग्राहकांना मोफत चहा आणि नाश्ता दिला जात आहे. ५ हजार लिटर डिझेल खरेदी केल्यानंतर मोबाईल, सायकल किंवा मनगटी घड्याळ मोफत दिलं जात आहे. तर १५ हजार लिटर डिझेल खरेदीवर कपाट, सोफा सेट किंवा शंभर ग्रॅमच्या चांदीचे नाणे दिले जात आहे. २५ हजार लिटर डिझेल खरेदी केल्यावर वॉशिंग मशीन तर ५० हजार लिटर खरेदीनंतर एसी आणि १ लाख लिटर खरेदी केल्यानंतर स्कूटर किंवा मोटारसायकल पेट्रोल पंप मालकांकडून मोफत दिली जात आहे. दरम्यान, मध्य प्रदेशात डिझेलवर २२ टक्के तर पेट्रोलवर २७ टक्के व्हॅट लावला जात असल्याचे पेट्रोल पंप मालकांनी सांगितले.

अशा आहेत आॅफर्स...

100 लिटर डिझेल - चहा-नाश्ता फ्री

5 हजार लिटर डिझेल - मोबाईल, सायकल किंवा मनगटी घड्याळ

15 हजार लिटर डिझेल - कपाट, सोफा सेट किंवा 100 ग्रॅम चांदीचं नाणं

25 हजार लिटर डिझेल - वॉशिंग मशीन

50 हजार लिटर डिझेल - एसी फ्री

1 लाख लिटर डिझेल- स्कूटर किंवा मोटारसायकल

 

बेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 11, 2018 06:41 PM IST

ताज्या बातम्या