रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! बिल भरलं नाही म्हणून वृद्धाला बेडला बांधलं

रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! बिल भरलं नाही म्हणून वृद्धाला बेडला बांधलं

रुग्णाच्या कुटुंबीयांनी केलेला हा आरोप रुग्णालयानं फेटाळून लावला आहे.

  • Share this:

शाजापूर, 07 जून : मध्य प्रदेशातील एका रुग्णालयात चक्क पूर्ण पैसे भरले नाहीत म्हणून वृद्ध रुग्णाला बेडला बांधून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाजापूर जिल्ह्यातील एका रुग्णालयात हा संपूर्ण प्रकार घडला. बिल थकवल्यानं रुग्णालयानं हे कृत्य केल्याचा आरोप रुग्णांचा नातेवाईकांनी केला आहे. तर रुग्णालयाकडून मात्र हा आरोप फेटाळून लावण्यात आला आहे.

लक्ष्मीनारायण असं या वृद्ध रुग्णाचं नाव आहे. या रुग्णाला जिल्हा रुग्णालयातून रेफर करण्यात आलं होतं. त्यांच्या कुटुंबियांनी पूर्ण बिल भरलं नाही म्हणून लक्ष्मीनारायण यांना बेडला हातपाय बांधून ठेवण्यात आल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. कुटुंबियांनी आधीच रुग्णालयाला पैसे नसल्याची पूर्वकल्पना दिली होती. तरीही रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टरांनी उपचार करून 11000 रुपयांचं बिल भरण्यास सांगितलं. बिल भरले नाही म्हणून रुग्णाला दोरीने बांधले असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

हे वाचा-मुंबई पालिकेचा महत्त्वाचा निर्णय, एका फोनवर मिळणार रुग्णालयातील खाटांची माहिती

लक्ष्मीनारायण यांना ज्या दिवशी रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हाच 6 हजार रुपये भरले होते. त्यानंतर आमच्याकडील पैसे संपले. दोन दिवसांपूर्वी मी आणखी पाच हजार रुपये जमा करायला सांगण्यात आले. आमच्याकडे पैसे नाहीत त्यामुळे पुढची ट्रीटमेंट करू नका असं या मुलीनं रिक्वेस्ट केली. मात्र रुग्णालयाकडून पूर्ण पैसे भरल्याशिवाय रुग्णाला सोडणार नाही असं सांगितल्याचा आरोप लक्ष्मीनारायण यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

तर रुग्णालयानं हा आरोप फेटाळून लावला आहे. लक्ष्मीनारायण यांना बांधून ठेवलं नाही. त्यांना झटके येत असल्यानं ते बेडवरून खाली पडू नयेत यासाठी अशापद्धतीनं करण्यात आल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

हे वाचा-शेतात गेलेले शेतकरी परतलेच नाही, आढळलेले ते अर्धवट खाल्लेले मृतदेह

हे वाचा-गेल्या 24 तासांत भारताने रेकॉर्ड मोडला, समोर आली सगळ्यात जास्त आकडेवारी

First Published: Jun 7, 2020 02:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading