झुरळाला घाबरणाऱ्या बायकोला नवरा वैतागला, घटस्फोटाची केली मागणी

झुरळाला घाबरणाऱ्या बायकोला नवरा वैतागला, घटस्फोटाची केली मागणी

पत्नी झुरळला (Cockroach)घाबरत असल्यानं पतीनं घटस्फोटाची मागणी केली आहे. पत्नीच्या झुरळाच्या भीतीमुळे लग्नानंतरच्या तीन वर्षात 18 घरं बदलली आहेत, असा पतीचा दावा आहे.

  • Share this:

भोपाळ, 12 एप्रिल: नवरा-बायकोच्या घटस्फोटाची (divorce) अनेक कारणं आजवर पुढं आली आहेत. लग्नानंतर सुरु झालेला, उभा केलेला संसार मोडण्याचं कारण काही वेळा अजब असतं. या अजब कारणांमध्ये आता आणखी एकाची भर पडली आहे. कारण, या प्रकरणात नवरा-बायकोमधील तणावाचं आणि ते प्रकरण घटस्फोटापर्यंत जाण्याचं कारण हे झुरळ (Cockroach) ठरलं आहे.

काय आहे प्रकरण?

मध्य प्रदेशची (Madhya Pradesh) राजधानी भोपाळ (Bhopal) मधील हे प्रकरण आहे. यामध्ये पत्नी झुरळला घाबरत असल्यानं पतीनं घटस्फोटाची मागणी केली आहे. पत्नीच्या झुरळाच्या भीतीमुळे लग्नानंतरच्या तीन वर्षात 18 घरं बदलली आहेत, असा पतीचा दावा आहे.

'सॉफ्टेवेअर इंजिनिअर' असलेल्या या तरुणाचं लग्न तीन वर्षांपूर्वी झालं आहे. सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले. त्यानंतर त्याची पत्नी एकदा घरात झुरळ पाहून घाबरली. तिची समजूत काढण्याचा घरच्यांनी प्रयत्न केला, पण तिची भीती गेली नाही. अखेरीस त्यांनी ते घर बदललं. गेल्या तीन वर्षात झुरळामुळेच 18 वेळा घर बदललं असून यामुळे आपल्याला आणि आपल्या कुटुंबीयांना त्रास सहन करावा लागतो, तसंच लजास्पद परिस्थितीचा सामना करण्याची वेळ आली आहे, असा आरोप तिच्या पतीनं केला आहे.

झुरळ दिसताच पत्नी घाबरुन घरातील सामान रस्त्यावर ठेवते. या प्रकरणात पत्नीला अनेक मनोविकार तज्ज्ञांना दाखवण्यात आलं आहे, पण त्यांनी दिलेले औषधं खाण्यास पत्नी तयार नसते, असंही या तरुणानं केला आहे. पत्नीनं मात्र हे सर्व आरोप फेटाळले असून आपल्याला वेडं ठरवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा दावा केला आहे.

किन्नर एकता जोशी हत्या प्रकरण: आरोपींना मिळालेली 55 लाखाची सुपारी; सांगितलं हत्येचं कारण )

या तरुणाने या प्रकरणात आता वेलफेयर सोसायटीमध्ये घटस्फोटासाठी धाव घेतली आहे. घटस्फोट घेण्यासाठी हे कारण योग्य नसल्याचं वेलफेयर सोसायटीचं मत आहे. सध्या या जोडप्याचं कौन्सिलिंग सुरु आहे.

Published by: News18 Desk
First published: April 12, 2021, 3:14 PM IST

ताज्या बातम्या