धक्कादायक! क्षणात 7 बस जळून खाक, अज्ञात टोळक्याने पेट्रोल टाकून स्टँडवर उभ्या बस पेटवल्या

धक्कादायक! क्षणात 7 बस जळून खाक, अज्ञात टोळक्याने पेट्रोल टाकून स्टँडवर उभ्या बस पेटवल्या

अज्ञात टोळक्यानं पेट्रोल टाकून या बस पेटवल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

  • Share this:

आनंद निगम

उज्जैन, 4 जून : उज्जैन (UJJAIN) येथील नानाखेडा बस स्टँडवल उभ्या सात बसला  (bus) गुरूवारी पहाटे भीषण आग (fire) लागली. फायर ब्रिगेडच्या (fire brigade) 8 गाड्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने आग आटोक्यात आणली. तोपर्यंत भीषण आगीत 7 बस जळून खाक झाल्या आहेत. अज्ञात टोळक्यानं पेट्रोल टाकून या बस पेटवल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. उज्जैन येथील नानाखेडा बस स्टँडहून धावणाऱ्या बस तब्बल अडीच महिन्यांपासून उभ्या आहेत. गुरूवारी पहाटे स्टँडवर उभ्या बसला अचानक आग लागली. आग क्षणात पसरली आणि इतर बसही यात जळून खाक झाल्या. आग एवढी भीषण होती की, 7 बसचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला आहे.

आगीची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. 8 गाड्यांच्या मदतीने जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र, 7 बस जळून खाक झाल्या आहेत.

निसर्ग चक्रीवादळाचं थैमान.. जाणून घ्या पुण्यात कुठे आणि किती पडला पाऊस?

अज्ञात टोळक्यानं बसवर पेट्रोल टाकून आग लावल्याचा प्राथमिक अंदाज फायर ब्रिगेडचे अधिकारी आणि पोलिसांनी व्यक्त केला आहे. नियोजनबद्धरित्या बस गाड्यांवर पेट्रोल टाकून आग लावण्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिस या प्रकरणी कसून चौकशी करत आहेत.

जाळपोळीची शक्यता...

उज्जैन शहरात बुधवारी रात्री रिमझिम पाऊस सुरू होता. आग विझवण्यासाठी आलेल्य फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पावसामुळे शॉर्ट सर्किट झाली असेल तर एकाच बसला आग लागली असती. मात्र, येथे एकाच वेळी 7 बस जळून खाक झाल्या आहेत. धक्कादायक म्हणजे आगीची घटना घडत असताना एकही सुरक्षा कर्मचारी किंवा पोलिस कर्मचारी घटनास्थळी नव्हता.

बस स्टँडपासून पोलिस स्टेशन हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे नियोजनबद्धरित्या बस गाड्यांवर पेट्रोल टाकून आग लावण्यात आल्याचा  संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

अन्य बातम्या

...अन् एका क्षणात 8 घरं समुद्रात वाहून गेली, पाहा भूस्खलनाचा थरारक LIVE VIDEO

राज्यसभा निवडणुकीआधी काँग्रेसला भगदाड, भाजपची ताकद वाढणार?

First published: June 4, 2020, 3:01 PM IST
Tags: Ujjain

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading