भोपाळ,4 जानेवारी: चिमेस एव्हिएशनचे एक ट्रेनी विमान धावपट्टीपासून काही अंतरावर असलेल्या एका शेतात कोसळले. या दुर्घटनेत मुंबईतील रहिवासी दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील ढाना येथे शुक्रवारी रात्री 9 वाजता ही घटना घडली. अशोक मकवाना आणि पीयूष चंदेल (ट्रेनी) अशी मृत वैमानिकांची नावे आहेत. रात्रकालीन उड्डाणानंतर हा अपघात झाला. धुक्यामुळे वैमानिकाला धावपट्टी न दिल्याने विमान 80-100 मीटर अंतरावर असलेल्या शेतात कोसळले. या घटनेनंतर चीफ ऑपरेटिंग ऑफिसर वायएन शर्मा हे दिल्लीहून सागरकडे रवाना झाले आहेत.
धुक्यामुळे दिसली नाही धावपट्टी..
चिमेस एव्हिएशन अकादमीच्या ट्रेनी विमानाने ढाना येथून रात्री 8 वाजून 35 मिनिटांला उड्डाण केले होते. अर्धा तासानंतर लॅडिंग करताना वैमानिकाला दाट धुक्यामुळे धावपट्टी दिसली नाही. त्यामुळे पीयूष चंदेल (ट्रेनी) आणि अशोक मकवाना (ट्रेनर) या दोघांचा गोंधळ उडाला. यातच विमान थेट घावपट्टीपासून काही अंतरावर असलेल्या शेतात कोसळले.
Madhya Pradesh: Two killed after a trainer aircraft of an aviation academy crashed in Sagar district, late night on January 3. The deceased pilots have been identified as trainer Ashok Makwana and Trainee Piyush Singh Chandel. pic.twitter.com/GKLLK8zg4Y
— ANI (@ANI) January 3, 2020
अपघाताची माहिती मिळताच चिमेस एव्हिएशन अकादमीचे अधिकारी घटनास्थली पोहोचले. जखमी झालेल्या दोन्ही वैमानिकांना विमानातून बाहेर काढण्यात आले. खासगी वाहनातून त्यांना तातडीने सागरश्री हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. दरम्यान, जवळपास 10 वर्षांपूर्वी चिमेस एव्हिएशनचे एक ट्रेनी विमान जबलपूरच्या बरगी डॅममध्ये कोसळले होते. या दुर्घटनेत एक ट्रेनी वैमानिकाचा मृत्यू झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Latest news, Madhya pradesh, Plane crashes