भोपाळ, 1 डिसेंबर : हल्लीच्या सोशल मीडियाच्या युगात फेसबुकवरील फ्रेन्डशिप्स अगदीच पॉप्युलर झाल्या आहेत. फेसबुकवर अनेक मुले आपल्या अकाऊंट वरून मिम्स शेअर करून मज्जा मस्ती करत असतात. त्याच वेळी काही तरुण मुलंमुली फेसबुकवर भेटून ऑनलाइन चॅट करून मैत्री करतात आणि मैत्रीच्या ओघात अनेक आगळीवेगळी पाऊले उचलतात. या पाऊलांनी होणाऱ्या दुष्परिणामांना सामोरं जाताना त्यांना व त्यांच्या जवळील लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. असाच एक धक्कादायक आणि विचित्र प्रकार नेपाळ आणि भारतातील एक तरुण-तरुणीबाबत समोर आला आहे.
नेपाळमधील एक 16 वर्षांची मुलगी आपल्या 20 वर्षांच्या फेसबुक बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी मध्य प्रदेशातील सीहोर जिल्ह्यात पोहोचली. हा प्रकार सरकारी यंत्रणेच्या लक्षात आल्यानंतर तिला भोपाळमधील बाल कल्याण समितीकडे सोपवण्यात आलं. उपविभागीय अधिकारी (SDOP) मोहन सरवान यांनी पत्रकारांना सांगितले की, काठमांडू येथील रहिवासी मुलीने गेल्या दोन वर्षांपासून सीहोर जिल्ह्यातील आष्टा शहरात राहणाऱ्या या व्यक्तीशी तिचा संपर्क असल्याचे पोलिसांना सांगितले.
"मुलीने आम्हाला सांगितले की ती काठमांडूहून भारतात आली होती. त्यानंतर शनिवारी तिच्या मित्राला भेटायला जाण्यापूर्वी तिने भारतातील विविध शहरांमध्ये बसमधून प्रवास केला," एसडीओपींनी सांगितले. ते म्हणाले, मुलीच्या फेसबुक मित्राने, जो आष्टा येथे एका मेडिकल स्टोअरमध्ये काम करणारा आहे, तिच्या आगमनाबद्दल पोलिसांना माहिती दिली.
हे वाचा-भयंकर! ड्रायव्हर रस्त्यावर वाहनांना चिरडत सुसाट निघाला, एकाचा मृत्यू, 5 जण जखमी
तिचा कोव्हिड-19 चा सॅम्पल घेण्यात आल्यानंतर मुलीला भोपाळच्या बाल कल्याण समितीकडे सोपविण्यात आले आहे. समिती तिला परत पाठविण्याबाबत पुढील कारवाई केली जाणार असल्याचं सरवन यांनी सांगितले.
आपली फेसबुकची मैत्री त्या मुलीला चक्क या कोव्हिड काळात आपल्या देशातून परदेशात घेऊन आली. असे अनेक किस्से या आधी सुद्धा समोर आले आहेत, आणि अनेकदा समाजात या बाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तरुणांची अशा प्रकारची मनस्थिती समजून त्याला नियंत्रणात आणण्यासाठी पालकांनी आणि भारत सरकारने अनेक प्रयत्न केले आहेत.