'रेल्वेमध्ये मसाज देणं हे भारतीय संस्कृतीच्या विरोधात'

'रेल्वेमध्ये मसाज देणं हे भारतीय संस्कृतीच्या विरोधात'

रेल्वेमध्ये प्रवाशांना मसाज द्यायला इंदूरच्या खासदारांनी विरोध केला आहे. ज्या रेल्वेगाड्यांनी गरीब प्रवासीही प्रवास करतात त्या गाड्यांमध्ये अशी चैनीची सेवा कशाला, असा सवाल त्यांनी केला आहे.

  • Share this:

इंदूर, 13 जून : भारतीय रेल्वेने प्रवाशांना नव्यानव्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. अशीच सुविधा रेल्वेने नुकतीच जाहीर केली. ही सुविधा आहे, प्रवाशांना मसाज देण्याची. मध्य प्रदेशमधल्या रतलाम मंडल या समितीने याबद्दलचा प्रस्ताव तयार केला होता.

इंदूरमधून निघणाऱ्या 39 रेल्वेगाड्यांमध्ये ही सुविधा देण्यात येणार आहे. पण रेल्वेच्य़ा या मसाज सेवेला इंदूरचे खासदार शंकर ललवानी यांनी विरोध केला आहे. शंकर ललवानी यांनी याबद्दलचं पत्र रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना लिहिलं आहे.

महिलांच्या उपस्थितीत अशी पद्धतीने मसाज सेवा देणं हे भारतीय संस्कृतीच्या विरोधात आहे, असं या खासदारांचं म्हणणं आहे. प्रवाशांना वैद्यकीय मदत देणं, डॉक्टर असणं अशा सेवा रेल्वेसाठी महत्त्वाच्या आहेत. मसाजसारख्या दर्जाहीन सेवा पुरवण्याची गरज नाही, असंही खासदार ललवानींचं म्हणणं आहे.

'चैनीची सेवा नको'

शताब्दी, राजधानी यासारख्या ट्रेन किंवा पर्यटकांसाठी असलेल्या गाड्यांमध्ये ही सेवा देणं ठीक आहे. पण ज्या भारतीय रेल्वेमधून अनेक गरीब प्रवासी प्रवास करतात तिथे अशी चैनीची सेवा काय कामाची ? असा सवालही त्यांनी केला आहे.

इंदूरहून निघणाऱ्या 39 रेल्वेगाड्यांमध्ये ही सुविधा सुरुवातीला उपलब्ध करुन देण्यात येईल, असं रेल्वेने म्हटलं होतं. यात देहरादून - इंदोर एक्सप्रेस (14317), नवी दिल्ली - इंदोर इंटरसिटी एक्सप्रेस (12416) आणि इंदोर - अमृतसर एक्सप्रेस 19325) याचा समावेश आहे.

100 रुपयांत करा रेल्वेत मसाज

ही सुविधा सकाळी 6 ते रात्री 10 पर्यत प्रवाशांना मिळू शकते, यासाठी डोक्यापासून पायापर्यंत एकदा मसाज करण्यासाठी प्रवाशांना 100 रुपये खर्च येईल. त्यासाठी रेल्वेत मसाजसाठी काही प्रतिनिधी असतील. त्यांना रेल्वेकडून ओळखपत्र देखील देण्यात येईल, असं रेल्वेने म्हटलं आहे.

याचा फायदा रेल्वेच्या महसूलात वाढ होऊन होणार असून यातून रेल्वेला 20 लाखाचा महसूल मिळण्याची खात्री आहे. या सेवेने वर्षाला रेल्वेचे 20 हजार प्रवासी वाढू शकतात आणि त्यातून वाढलेल्या तिकीट विक्रीतून 90 लाखाचा महसूल मिळण्याची शक्यता आहे.

==================================================================================================

VIDEO :जेव्हा सलमान खानने गायलं, 'गच्ची वरून कशी दिसते..'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 13, 2019 05:40 PM IST

ताज्या बातम्या