मराठी बातम्या /बातम्या /देश /

'रामनवमी- हनुमान जयंती साजरी करा', Congress अध्यक्षांच्या आदेशाला मुस्लिम आमदाराचा विरोध

'रामनवमी- हनुमान जयंती साजरी करा', Congress अध्यक्षांच्या आदेशाला मुस्लिम आमदाराचा विरोध

काँग्रेस पक्ष हिंदू सण उत्सवही प्रामुख्यानं साजरे करण्यावर भर देत आहेत. सॉफ्ट हिंदुत्वाच्या मार्गावर सध्या वाटचाल सुरु केलेल्या काँग्रेसला पक्षांतर्गत नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.

काँग्रेस पक्ष हिंदू सण उत्सवही प्रामुख्यानं साजरे करण्यावर भर देत आहेत. सॉफ्ट हिंदुत्वाच्या मार्गावर सध्या वाटचाल सुरु केलेल्या काँग्रेसला पक्षांतर्गत नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.

काँग्रेस पक्ष हिंदू सण उत्सवही प्रामुख्यानं साजरे करण्यावर भर देत आहेत. सॉफ्ट हिंदुत्वाच्या मार्गावर सध्या वाटचाल सुरु केलेल्या काँग्रेसला पक्षांतर्गत नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.

  • Published by:  Pooja Vichare
मध्यप्रदेश, 06 एप्रिल: आताच पाच राज्यातल्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर काँग्रेस पक्ष (Congress party) आपला दबदबा पुन्हा निर्माण करण्यासाठी हालचाली करत आहे. सध्या काँग्रेस आपल्या पक्षाचं धोरण बदलताना दिसत आहे. तसंच कालच झालेल्या बैठकीत काँग्रेसमध्ये मोठे बदलाचे संकेत ही दिसून आलेत. त्यातच पक्ष आता काहीसा सॉफ्ट हिंदुत्वाकडे वळताना दिसतोय. राहुल गांधी (Rahul Gandhi) असो किंवा प्रियांका गांधी वड्रा (Priyanka Gandhi-Vadra) प्रचारादरम्यान मंदिरात देवाचं दर्शन घ्यायला गेलेले दिसले. यासोबतच काँग्रेस पक्ष हिंदू सण उत्सवही प्रामुख्यानं साजरे करण्यावर भर देत आहेत. सॉफ्ट हिंदुत्वाच्या मार्गावर सध्या वाटचाल सुरु केलेल्या काँग्रेसला पक्षांतर्गत नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. पक्षानं रामनवमी आणि हनुमान जयंती करण्याचे निर्देश दिल्यानंतर पक्षातील मुस्लिम वर्गातून नाराजी पाहायला मिळतेय. कारण सध्या रमजानचा महिना सुरु आहे. त्यामुळे रमजानला वगळल्याचं मत समोर आल्याचं समजतंय. मध्यप्रदेशमधील काँग्रेसमध्ये असंच काहीसं घडलेलं चित्र पाहायला मिळतंय. प्रदेश काँग्रेसने आपल्या पदाधिकाऱ्यांना रामनवमी आणि हनुमान जयंती भव्य पद्धतीनं साजरी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर पक्षाचे आमदार आरिफ मसूद यांनी यावर प्रश्न उपस्थित केला. रामनवमी आणि हनुमान यामध्ये पक्ष रमजान का विसरली असा सवाल मसूद यांनी उपस्थित केला आहे. पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी काँग्रेसनं तयारी सुरू केली आहे. नुकतंच काँग्रेसने आपल्या पदाधिकारी, आमदार आणि कार्यकर्त्यांना आगामी रामनवमी आणि हनुमान जयंतीला रामलीला, सुंदरकांड आणि हनुमान चालिसाचे पठण करण्याचे निर्देश दिले. लोकांमध्ये आपला प्रवेश आणखी मजबूत करणं हा काँग्रेसचा यामागचा उद्देश आहे. त्याबाबत या सूचना देण्यात आल्या. मात्र या सूचनांना पक्षांतर्गत विरोध सुरू पाहायला मिळाला. काँग्रेसचे आमदार आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य आरिफ मसूद यांनी या आदेशावर उघड आक्षेप घेतला आहे. यासोबतच त्यांनी या आदेशाबाबत आपलं म्हणणे मांडलं आहे. जिल्हा पदाधिकाऱ्यांना पाठवलं पत्र रामनवमी आणि हनुमान जयंती भव्य पद्धतीनं साजरी करण्याचे पत्र प्रदेश काँग्रेसने सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना पाठवलं आहे. पत्रात म्हटले आहे की, रामनवमीच्या दिवशी कार्यकर्त्यांनी रामकथा, रामलीला आणि रामाच्या पूजेचे कार्यक्रम करावेत. तसंच हनुमान जयंतीला हनुमान चालीसा आणि सुंदरकांड पठण करा असं म्हटलं. रामनवमी 10 एप्रिलला आहे तर हनुमान जयंती 16 एप्रिलला आहे. सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष, आमदार, माजी आमदार, लोकसभेचे उमेदवार आणि आघाडी-संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना या सूचनेचे पालन करण्यास सांगण्यात आलंय. गोरखनाथ मंदिर हल्ला: आरोपी मुर्तझाचा लॅपटॉप उघडताच सर्वांचीच उडाली झोप याचदरम्यान यावरून पक्षात नाराजीचा सूर उमटण्यास सुरुवात झाली. भोपाळमधील काँग्रेस आमदार आरिफ मसूद यांनी पक्षाने जारी केलेल्या पत्रावर प्रश्न उपस्थित केला आहे. यावर ते म्हणाले, रामनवमी आणि हनुमान जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यास सांगितलं आहे, पण पक्ष रमझानपासून का दूर आहे? काय म्हणाले आरिफ मसूद या पत्रावर बोलताना मसूद म्हणाले की, राजकीय पक्षानं रामनवमी आणि हनुमान जयंती साजरी करण्याच्या सूचना देणं योग्य नाही. कोणत्याही एका समुदायाबद्दल असं बोलणं योग्य नाही. तुम्ही हनुमान जयंती आणि रामनवमीचा उल्लेख केला पण रमजानचा पवित्र महिना सोडला यावर माझा आक्षेप आहे. आंबेडकरांची जयंतीही वगळली. गणगौरसोबत गुड फ्रायडेचे नावही घेतले नाही. सर्व धर्मांच्या लोकांना समानता देणारा हा एकमेव पक्ष असल्यानं काँग्रेसला लोकं पाठिंबा देतात.
First published:

Tags: Madhya pradesh

पुढील बातम्या