मराठी बातम्या /बातम्या /देश /

तरुणाशी बोलते म्हणून घरच्यांनी भरचौकात मुलीला मारहाण करून कापले केस, शूट केला VIDEO

तरुणाशी बोलते म्हणून घरच्यांनी भरचौकात मुलीला मारहाण करून कापले केस, शूट केला VIDEO

अल्पवयीन मुलगी फोनवर मुलासोबत फोनवर बोलते यामुळे घरच्यांनी अमानुष मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Published by:  Suraj Yadav
भोपाळ, 29 फेब्रुवारी : मुलगी फोनवर बोलते म्हणून तिला सर्वांसमोर मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलगी फोनवर मुलासोबत फोनवर बोलते यामुळे घरच्यांनी अमानुष मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 25 फेब्रुवारीला ही घटना मध्य प्रदेशातील अलीराजपूर इथं घडली आहे. कुटुंबीयांना संशय होता की मुलगी मुलासोबत फोनवर बोलते. यावरूनच तिला गावाातील चौकात बसवून मारहाण करून तिचे केस कापले. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे. छेडछाड, मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमकीसह पॉस्को कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी धीरज बब्बर यांनी सांगितलं की, संबंधितांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तिन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुलीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलं की, गेल्या वर्षी मी गुजरातमध्ये मोलमजुरीसाठी गेले होते. त्यावेळी अलीराजपूरमधल्या सुमनियावाट गावातील तरुणाशी तिची ओळख झाली. जेव्हा घरी परतली तेव्हा तरुणाने अलीराजपूर बस स्टँडवर भेटायला बोलावलं होतं. बस स्टँडवर पोहोचली तेव्हा घरच्या लोकांनी पाहिलं. वाचा : हे राम! चक्क दारूने घातली अंघोळ, दारूबंदी असणाऱ्या गांधीजींच्या गुजरातमधला VIDEO मुलगी तरुणाला भेटायला गेल्यानं रागाच्या भरात घरच्या लोकांनी तिला मारहाण केली. यावेळी ती रडत असतानाही घरच्यांनी मारहाण थांबवली नाही. तिला मारल्यानंतर तिचे केसही कापण्यात आले. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला. वाचा : 60 वर्षांचा सुपरहिरो! महिलेला वाचवण्यासाठी 40 फूट उंचीवरून मारली उडी आणि...
First published:

Tags: Madhya pradesh

पुढील बातम्या