भोपाळ, 01 मार्च : साडी घेण्यासाठी सरकारने जवळपास 16 कोटींचा निधी दिला असतानाही रंग न ठरल्यानं अद्याप साडी न घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. सरकारनं दिलेला निधीही तसाच खात्यावर पडून असल्याचं सांगितलं जात आहे. मध्य प्रदेशात 2 लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांसह सहायिका आणि बाल शिक्षण केंद्रातील महिलांसाठी नव्या ड्रेस कोडची घोषणा करण्यात आली. त्यासाठी प्रत्येकाच्या खात्यावर 800 रुपये देण्याचंही ठरल्याप्रमाणं 16 कोटी रुपयांचा निधीही देण्यात आला मात्र तो निधी अद्यापही खात्यावर तसाच पडून आहे. याचं कारण म्हणजे साड्यांचा रंग कोणता निवडायचा यावर अजूनही शिक्कामोर्तब होणं बाकी आहे.
भाजप सरकारच्या काळात अंगणवाडीतील महिलांच्या साड्यांचा रंग गुलाबी होता. 12 वर्षांपासून गुलाबी रंगाच्या साड्या वापरल्या जात होत्या. मात्र सरकार बदलल्यानंतर आता या साड्यांचाही रंग बदलण्याचा निर्णय महिला व बाल विकास मंत्री इमरती देवी यांनी घेतला. मध्य प्रदेशात काँग्रेसचं सरकार आल्यानंतर मात्र गुलाबी रंग नको म्हणून आता नवीन रंगाच्या साड्या ड्रेस कोड म्हणून महिलांना देण्यात येणार आहेत. अशी घोषणा मंत्री इमरती देवी यांनी एक कार्यक्रमादरम्यान केली होती. त्यावेळी त्यांना रंग विचारला असता त्यांनी रंग सांगितला नाही. हा साड्यांचा रंग अजूनही न ठरल्यानं आलेला निधी तसाच खात्यावर पडून आहे. मध्य प्रदेशात बाल शिक्षण केंद्रात काम करत असलेल्या महिलांनाही ड्रेस कोड देण्यात येणार आहे. त्यांच्या आणि अंगणवाडी सेविकांच्या साडीपेक्षा रंग वेगळा असायला हवा त्यामुळे अद्याप रंग ठरला नाही.
हे वाचा-फाटक पडलं असतानाही नेली बाईक; एक्स्प्रेसने 2 जणांना चिरडलं, पाहा थरारक VIDEO
'' एक महिन्याआधीच आम्ही निधी खात्यात जमा केला आहे. मात्र अजूनही तो निधी वापरण्यात आला नाही. लवकरच ड्रेस कोड फायनल करून महिलांना देण्यात येईल अशी अपेक्षा आहे.'' असं महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त नरेश गोयल यांनी म्हटलं आहे.
'' आम्ही चांगल्या दर्जाच्या साड्या या सेविकांना आणि कर्मचाऱ्यांना देणार आहोत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात या साड्यांचा रंग निश्चित करण्यात येईल. सेविका या साड्या अंगणवाडी व्यतिरिक्तही इतर ठिकाणी वापरू शकतील अशा पद्धतीच्या साड्या देण्याचा विचार सुरू असल्याचं यावेळी महिला व बाल विकास मंत्री इमरती देवी यांनी म्हटलं आहे.
या साड्यांचा रंग निश्चित झाल्यानंतर सूरत इथल्या साडी तयार करणाऱ्या कंपनीला त्याची ऑर्डर देण्यात येणार आहे. त्यानंतर या साड्या जिल्ह्यातील अनेक भागांतील दुकानांमध्ये उपलब्ध करून देण्यात येतील अशी माहिती मिळत आहे.
हे वाचा-रचला इतिहास! महाराष्ट्राच्या डॉ. माधुरी कानिटकर लेफ्टनंट जनरल पदी
Published by:Kranti Kanetkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.