छतरपूर, 21 फेब्रुवारी : रुग्णालयात डॉक्टरांची खुर्ची रिकामी असल्याचं पाहून मनोरुग्ण त्यावर बसला इतकच नाही तर चक्क त्यानं डॉक्टरांसारखं रुग्णांना तपासलं आणि औषधं देखिल दिली, रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार एका मेडिकल स्टोअरमध्ये काम करणाऱ्या तरुणानं उघडकीस आणला आहे. मध्य प्रदेशातील छतरपूर भागात ही घटना समोर आली.
रुग्णालयात सगळेजण डॉक्टरांची वाट पाहात होते. हा मनोरुग्ण थेट डॉक्टरांच्या खुर्चीवर जाऊन बसला आणि डॉक्टर असल्यासारखं वागू लागला. त्यामुळे रुग्णांनाही हेच डॉक्टर असल्याचं वाटलं आणि तपासण्यासाठी ते आतमध्ये गेले. रुग्ण येत होते तसा हा मनोरुग्ण असणारा व्यक्ती त्यांना तपासत होता. त्याने अर्ध्याहून अधिक लोकांना टेस्ट करून औषधांची चिठ्ठीही दिली.
हेही वाचा-VIDEO : शत्रुघ्न सिन्हा गूपचूप गेले पाकिस्तानला, सोशल मीडियावर चर्चा
लाल रंगाच्या पेनानं लिहिलेला कागद घेऊन हे सगळे रुग्ण जवळ असलेल्या मेडिकलमध्ये गेले. तिथे मेडिकलमध्ये काम करणाऱ्या तरुणाला हस्ताक्षरात गडबड वाटली आणि त्याने सर्व रुग्णांच्या चिठ्ठ्य़ा पाहिल्या. हा नेमका काय प्रकार आहे काही तरी गडबड आहे हे त्याच्या ध्यानात आलं आणि त्याने रुग्णालयात जावून चौकशी केली.
औषधांची चिठ्ठी देणारा डॉक्टर कुठे अशी विचारणा केली असता 20 नंबरच्या खोली क्रमांकामध्ये डॉक्टर नसून अज्ञात व्यक्ती असल्याचं लक्षात आलं. तातडीनं रुग्णालयातील अधिकाऱ्यांना याची माहिती देऊन चौकशी करण्यात आली तेव्हा हा अज्ञात व्यक्ती मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली. या घटनेमुळे रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. अशापद्धतीची घटना कशी घडू शकते? रुग्णांच्या जीवासोबत खेळ आहे अशा संतप्त प्रतिक्रिय़ाही काही रुग्णांमधून उमेटल्या. दरम्यान रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी या मनोरुग्णाला डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर काढलं आणि वातावरण शांत केलं. दरम्यान रुग्णांनाही त्या गोळ्या घेऊ नयेत आणि रुग्णालय आणि आसपासच्या मेडिकल परिसरातही अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या मनोरुग्णालाय संपूर्ण प्रकार काय आहे असे विचारले असता डॉक्टर आले नसल्यानं रुग्ण ताटकळ थांबले होते आणि मी दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील डॉक्टर असल्याचा दावाच या मनोरुग्णानं केला आहे. दिलेली औषध बरोबर असल्याचाही दावा त्याने केला आहे. या प्रकरणाची आयुक्तांनी गंभीर दखल घेतली असून या मनोरुग्णाची सध्या चौकशी सुरू आहे. या प्रकरणी छतरपूर परिसरातील सर्व रुग्णालयांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हेही वाचा-सरकारच्या तिजोरीपेक्षा पाचपट सोनं! जगभरात भारताचा नंबर कितवा?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.