मराठी बातम्या /बातम्या /देश /

प्रेमासाठी सर्व बंधनं झुगारली अन् नाजनीनने घेतल्या सप्तपदी

प्रेमासाठी सर्व बंधनं झुगारली अन् नाजनीनने घेतल्या सप्तपदी

भांगेत कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, लाल रंगाच्या साडीत नाजनीनने आपल्या प्रेमासाठी समाजाचं बंधन झुगारलं आणि हिंदू धर्म स्वीकारला.

भांगेत कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, लाल रंगाच्या साडीत नाजनीनने आपल्या प्रेमासाठी समाजाचं बंधन झुगारलं आणि हिंदू धर्म स्वीकारला.

भांगेत कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, लाल रंगाच्या साडीत नाजनीनने आपल्या प्रेमासाठी समाजाचं बंधन झुगारलं आणि हिंदू धर्म स्वीकारला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Madhya Pradesh, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

मंदसौर, 22 नोव्हेंबर : मागच्या काही दिवसांपूर्वी देश हादरवून टाकणारी घटना घडली. श्रद्धा वालकर या मुलीचे 35 तुकडे करून खून करण्यात आल्याच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. श्रद्धाचा खून करणारा आरोपी मुस्लीम असल्याने आफताब यांच्या प्रेम प्रकरणावरुन पुन्हा एकदा लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. आफताबने श्रद्धाची निष्ठूरपणे हत्या केल्यामुळे याप्रकरणाला धार्मिक वळण दिले जात असल्याचेही दिसून येते. दरम्यान अशातच मध्य प्रदेशमध्ये एका मुस्लीम मुलीने प्रेमाची ताकद काय असते ते दाखवून दिले आहे.

मुस्लीम धर्माचा त्याग करुन हिंदू धर्म स्विकारल्याची माहिती समोर आली आहे. म्हणतात ना, प्रेम जर खरे असेल तर त्याला एक ना एक दिवस नक्कीच यश मिळते. असेच काहीसे मध्य प्रदेशातील गुना येथील नाजनीन आणि दीपक गोस्वामी यांच्यासोबत घडले आहे. दोघेही चार वर्षांपूर्वी टिकटॉकच्या माध्यमातून एकमेकांना भेटले होते.

हे ही वाचा : 10 वर्ष मोठ्या व्यक्तीला डेट करतेय मानुषी छिल्लर; बॉयफ्रेंडबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला कदाचित माहिती नसतील

यातून दोघांच्या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले, नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात कधी झाले हे दोघांनाही कळले नाही. प्रेमाखातर नाजनीनने मुस्लिम धर्म सोडून सनातन हिंदू धर्म स्वीकारला आहे. दरम्यान दोघेही आयुष्य भर एकत्र राहण्यसााठी सज्ज झाले आहेत.

मंदसौरच्या गायत्री मंदिरात दोघांनी विवाह केला असून सोशल मीडियावर या लग्नाचे फोटोही व्हायरल होत आहेत. या लग्नसोहळ्याला हिंदू धर्मगुरुही उपस्थित होते. विशेष म्हणजे गेल्या ६ महिन्यांत मंदसौर येथील मंदिरात धर्म परिवर्तन करुन लग्न करण्याची ही ५ वी घटना आहे. दिपक आणि नैनी यांनी पोलीस प्रशासनाला आपल्या सुरक्षेसाठी विनंती केली आहे. 

कारण, आपल्या कुटुंबासमवेत गुना जिल्ह्यातील कुंभराज येथेच दोघांनाही आपला संसार थाटायचा आहे. दरम्यान, २० मे रोजी दिपकच्या लग्नाची तारीख ठरली होती, पण नाजनीनने हिंदु धर्म स्विकारण्याचे कबुल केल्यानंतर दिपकनेही नाजनीनसोबतच लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला.

नाजनीन बानो आणि दीपक गोस्वामी यांची प्रेमकहाणी बॉलिवूड चित्रपटासारखीच म्हणावी लागले. नाजनीन 4 वर्षांपूर्वी टिकटॉकवर दीपकला भेटली होती. दोघांची घरे एकाच वस्तीत होती. नाजनीन आधी टिकटॉकवर दीपकला फॉलो करत होती यातून त्यांची मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

हे ही वाचा : करा हो लगीनघाई! 2023 सालातील लग्नाचे सर्व शुभ मुहूर्त एका क्लिकवर

प्रेमासाठी वाट्टेल ते… मुस्लीम धर्माचा त्याग करून हिंदू धर्माचा केला स्विकार

Madhya pradesh mandsaur

प्रेम इतकं घट्ट झालं की, दोघेही 6 महिन्यांपूर्वी न सांगता घरातून पळून गेले. त्यानंतर दोघांनीही आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. दोघेही घरी परतले. या दरम्यान, दीपकच्या कुटुंबीयांनी त्याचे लग्न दुसऱ्या मुलीसोबत लावणार असल्याचे कळताच नाजनीनने सनातन हिंदू धर्म स्वीकारण्यास तयार असल्याचे सांगत लग्न केले.

First published:

Tags: Madhya pradesh, Wedding, Wedding couple