कैदी पळाला अन् नाल्यात पडला! पोलिसांबरोबरच्या झटापटीचा LIVE VIDEO आला समोर

कैदी पळाला अन् नाल्यात पडला! पोलिसांबरोबरच्या झटापटीचा LIVE VIDEO आला समोर

कैदी नाल्यात उडी मारून पळून जात होता. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे या कैदाला अटक करण्यात आली. या सगळ्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

  • Share this:

भोपाळ, 19 ऑगस्ट : मध्य प्रदेशात एक धक्कादायक प्रकार घडला. मध्य प्रदेशातील रायसेन येथील तुरुंगातून एक कैदी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. या कैदावर उपचार करण्यासाठी त्याला रुग्णालयात घेऊन जात असताना हा प्रकार घडला. हा कैदी नाल्यात उडी मारून पळून जात होता. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे या कैदाला अटक करण्यात आली. या सगळ्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

उपचारासाठी या कैद्याला रुग्णालयात आणण्यात आले होते. रुग्णालयात कैदाचा एक्स-रे करण्यासाठी त्याच्या बेड्या पोलिसांनी काढल्या. या कैद्याचे नाव मचल सिंह असल्याचे सांगितले जात आहे. तेवढ्यात कैद्यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये हा कैदी पळून जाताना दिसत आहे. नाल्यात उडी मारून कैदी पळत असताना, पोलिसांनी त्याला पकडलं.

वाचा-#BREAKING : आग्रामध्ये 35 प्रवाश्यांनी भरलेली बस हायजॅक

वाचा-भरदिवसा व्यावसायिकाला जिवंत जाळलं; 90 टक्के भाजलं शरीर

या व्हिडीओमध्ये जेल कर्मचारी आणि पोलीस कैदामागे धावताना दिसत आहेत. अखेर पोलिसांनी या कैद्याला पुन्हा अटक केली. आरोपी मचल सिंह याला बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली होती. पोलिसांनी या कैद्याला अटक करून तुरुंगात डामले आहे. हा सर्व घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काहींनी पोलिसांवर टीका केली आहे. तर, काहींनी पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे कौतुक केले आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: August 19, 2020, 10:27 AM IST

ताज्या बातम्या