'हॅलो काका! बाबा मला पैशांसाठी विकत आहेत, मला शिकायचंय'

'हॅलो काका! बाबा मला पैशांसाठी विकत आहेत, मला शिकायचंय'

केवळ पैशांसाठी एका अल्पवयीन मुलीचं लग्न लावून दिलं जात असल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

  • Share this:

भोपाळ, 25 जून : केवळ पैशांसाठी एका अल्पवयीन मुलीचं लग्न लावून दिलं जात असल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेमागे मुलीचे बाबा आणि मामाचाच हात होता. पण त्यांचा हा कट मुलीनं हुशारीनं उधळून लावला. मुलीनं चाइल्ड हेल्पलाइनकडे संपर्क साधत स्वतःची यातून सुटका करून घेतली. स्वतः मुलीनंकडून तक्रार मिळाल्यानंतर चाइल्डलाइन आणि स्थानिक पोलिसांनी याविरोधात तातडीनं कारवाई केली आणि तिला आपल्या ताब्यात घेतलं. मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील ही घटना आहे.

(पाहा :VIDEO : अटलजींच्या सरकारचं कधी कौतुक केलं का? मोदींचा काँग्रेसला थेट सवाल)

'वडील आणि मामा फक्त आणि फक्त पैशांसाठी माझं लग्न लावत आहेत', अशी माहिती मुलीनं धाडस करून चाइल्डलाइनला संपर्क करत सांगितली.

'वडील आणि नातेवाईक तिचं जबरदस्तीनं लग्न लावत होते', असा गंभीर आरोप या मुलीनं केला आहे. दरम्यान, या प्रकरणी कारवाई करत मुलीला बाल कल्याण समितीकडे सोपवलं आहे. समितीकडून सध्या कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. या मुलीनं चांगलं शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

(पाहा :VIDEO : नाशिकच्या मुथ्थुट फायनान्समध्ये समुअल्सवर गोळीबार करणारा व्हिडिओ समोर)

मुलीचा कुटुंबीयांकडे जाण्यास नकार

तसंच मुलीनं आपल्या कुटुंबीयांकडे जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे. बाल कल्याण समितीकडून मुलीचं काउन्सिलिंग करत आहेत. तिच्या काही वैद्यकीय चाचण्यादेखील करण्यात आल्या आहेत.

VIDEO : मीच रेल्वे चालवणार, मनोरुग्ण तरुणाने घेतला इंजिनचा ताबा!

First published: June 25, 2019, 8:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading