MP Crisis: कमलनाथ यांच्याकडे सरकार वाचवण्यासाठी फक्त 24 तास

मध्य प्रदेशातील राजकारणाची समीकरणं ज्योतिरादित्य शिंदेंच्या एका निर्णयानं बदलताना पाहायला मिळत आहेत.

मध्य प्रदेशातील राजकारणाची समीकरणं ज्योतिरादित्य शिंदेंच्या एका निर्णयानं बदलताना पाहायला मिळत आहेत.

  • Share this:
    भोपाळ, 15 मार्च : मध्य प्रदेशातील राजकारणाची समीकरणं ज्योतिरादित्य शिंदेंच्या एका निर्णयानं बदलताना पाहायला मिळत आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह 22 आमदारांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपची साथ दिल्यानं कमलनाथ सरकारला मोठा धक्का बसला आहे. असं असलं तरीही मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपल्याकडे बहुमत आहे आणि त्यामुळे आपलं सरकार पडणार नाही असा दावा केला आहे. काँग्रेसचं सरकार पाडण्याचा केंद्रातील भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा डाव यशस्वी होणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. याचं कारण म्हणजे उद्यापर्यंत मुख्यमंत्री कमलनाथ यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील काँग्रेसचं सरकार अल्पमतात असल्यानं पडेल असा दावा भाजपच्या नेत्यांनी केला आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मध्य प्रदेशचे राज्यपाल लालाजी टंडन यांची भेट घेतली होती. सोमवारी सकाळी कमलनाथ सरकारची प्लोअर टेस्ट होणार आहे. यामध्ये जर काँग्रेस आपलं बहुमत सिद्ध करू शकलं नाही तर कमलनाथ सरकार कोसळण्याची शक्यता आहे. प्लोअर टेस्ट संदर्भात राज्यपालांनी निर्देश जारी केले आहेत. विधानसभेत सकाळी विधानसभा अध्यक्षांच्या अभिभाषणानंतर 11 वाजता प्लोअर टेस्टला सुरुवात होईल असं राज्यपालांनी सांगितलं आहे. ही प्लोअर टेस्ट आमदारांनी आपल्या जागेवरील असलेलं बटन दाबून हो किंवा नाही हा पर्याय निवडायचा आहे. त्यावरून बहुमताचा निकाल येणार आहे. हे वाचा-दुष्काळात तेरावा महिना; 'कोरोना'सह आता बर्ड फ्लू, स्वाइन फ्लूचा कहर मध्य प्रदेशात सुरू असलेल्या राजकीय नाट्याच्या दरम्यान मुख्यमंत्री कमलनाथ यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. बंगळुरुमध्ये असलेले 22 काँग्रेसचे आमदार मध्य प्रदेशात सुखरूप परत येऊ शकतात आणि 16 मार्चपासून सुरू होणार्‍या विधानसभा अधिवेशनात कोणत्याही प्रकारची भीती न घेता सहभागी होऊ शकतात याची काळजी घ्यावी, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांना केली आहे. हे वाचा-Corona ची 'आपत्ती' - कायदा मोडणाऱ्यांना तुरुंगवास; मृतांच्या कुटुंबांना 4 लाख
    First published: