मराठी बातम्या /बातम्या /देश /

MP मध्ये 'राजकीय संकट',आजही होणार नाही फ्लोअर टेस्‍ट, सुप्रीम कोर्टात होईल सुनावणी

MP मध्ये 'राजकीय संकट',आजही होणार नाही फ्लोअर टेस्‍ट, सुप्रीम कोर्टात होईल सुनावणी

संपूर्ण जगात कोरोना व्हायरसची दहशत असताना मध्य प्रदेशात राजकीय संकट उभं राहिलं आहे.

संपूर्ण जगात कोरोना व्हायरसची दहशत असताना मध्य प्रदेशात राजकीय संकट उभं राहिलं आहे.

संपूर्ण जगात कोरोना व्हायरसची दहशत असताना मध्य प्रदेशात राजकीय संकट उभं राहिलं आहे.

  • Published by:  Sandip Parolekar
भोपाळ 17 मार्च: संपूर्ण जगात कोरोना व्हायरसची दहशत असताना मध्य प्रदेशात राजकीय संकट उभं राहिलं आहे. मध्य प्रदेशात विधानसभेत कमलनाथ सरकारची फ्लोअर टेस्ट मंगळवारीही होणार नाही. राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना 17 मार्चला फ्लोअर टेस्ट घेऊन बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं होतं. मात्र, विधानसभाध्यक्षांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर 16 मार्चला विधानसभेचं कामकाज 26 मार्चपर्यत स्थगित केल्याची घोषणा केली. असं असताना विधानसभेत फ्लोअर टेस्‍टची कोणतीही तयारी करण्यात आलेली नाही. मंगळवारी फ्लोअर घेण्यासंदर्भात विधानसभेने कोणतीय कार्यसूचना जारी केलेली नाहा. दरम्यान, मध्य प्रदेशातील राजकीय नाट्य अद्याप संपलेलं नाही. त्याचा शेवटचा अंक मंगळवारी होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांना पत्र लिहून राज्यपाल लालजी टंडन यांनी मंगळवारीच म्हणजे 17 मार्चला फ्लोअर टेस्ट घ्या, असं सांगितलं आहे. 17 मार्चला फ्लोअर टेस्ट घेतली गेली नाही, तर काँग्रेसकडे बहुमत नाही, असं मानलं जाईल, असे स्पष्ट निर्देश राज्यपालांनी दिले आहेत. दुसरीकडे, मागील वर्षांतील कर्नाटकातील घटनाक्रम लक्षात घेत माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. विधानसभा स्थगित करण्याच्या निर्णयाला आव्हान देत शिवराज चौहान आणि भाजपच्या 10 आमदारांनी 12 तासांत बहुमत चाचणी घेण्याची मागणी करत लवकरात लवकर सुनावणीची विनंती केली. याचिकेवर आज (मंगळ‌वारी) सुनावणी होण्याची शक्यता आहे. हेही वाचा.. कोरोनाचा कहर! मृतांची संख्या वाढली, आतापर्यंत 7 हजार लोकांचा घेतला जीव त्याआधी आज मध्य प्रदेश विधानसभेच्या बजेट सेशनला सुरुवात होणार होती. पण पहिल्याच दिवशी प्रचंड गदारोळानंतर कामकाज थांबवण्यात आलं. अर्थसंकल्पीय अधिवेशन 26 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आलं. या वेळात काँग्रेसला बंडखोर आमदारांचं मन वळवणं सोपं जाईल, असं मानण्यात येत होतं. पण आता राज्यपाल लालजी टंडन यांच्या पत्रानंतर कमलनाथ सरकारपुढच्या अडचणी वाढल्या आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपप्रवेश केल्यानंतर मध्य प्रदेशातलं काँग्रेस सरकार अस्थिर झालं. ज्योतिरादित्य यांच्या समर्थक 22 काँग्रेस आमदारांनी राजीनामे दिले आणि त्यामुळे सरकार अल्पमतात आलं. आमच्याकडे बहुमत असल्याचा दावा कमलनाथ यांनी केला असला, तरी त्यांना आता ते उद्याच्या उद्याच सिद्ध करावं लागणार आहे. हेही वाचा..माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई राज्यसभेवर; राष्ट्रपतींनी केलं नामांकित विधानसभेचं कामकाज आणि पर्यायाने फ्लोअर टेस्ट 26 मार्चपर्यंत पुढे ढकलल्यानंतर भाजपने बहुमत चाचणी लवकरात लवकर घेण्याची मागणी केली होती. 106 आमदारांची राज्यपालांपुढे परेड घेऊन जात त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला. त्यानंतर राज्यपाल लालजी टंडन यांनी कमलनाथ यांना पत्र लिहून 17 मार्चला बहुमत चाचणी घेण्याविषयी सांगितलं आहे. कमलनाथ यांनी तत्पूर्वी आमचं सरकार अल्पमतात नसल्याचा दावा केला होता. भाजपला तसं वाटत असेल तर त्यांनी अविश्वास ठराव मांडावा, असं आव्हान दिलं होतं.
First published:

Tags: Madhya pradesh

पुढील बातम्या