भयंकर! इच्छा पुरी करण्यासाठी इथे लोक गायीच्या पायदळी स्वत:ला सोपवतात

भयंकर! इच्छा पुरी करण्यासाठी इथे लोक गायीच्या पायदळी स्वत:ला सोपवतात

  • Share this:

भोपाळ, 14 नोव्हेंबर : बऱ्यादचा काही गोष्टी या मानन्यावर आणि लोकांच्या श्रद्धेवर असतात. त्यातच एका गावात परंपरेन चालत आलेली एक अजब प्रथा इथली आस्था आहे की अंधश्रद्धा असा प्रश्न पडत आहे. याचं कारण म्हणजे ही प्रथा देखील तेवढीच भयंकर आहे. मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात बर्‍याच धार्मिक प्रथा प्रचलित असल्या तरी गाय गौहरी ही सर्वात विशिष्ट गोष्ट आहे. हा सण दिवाळीच्या दुसर्‍या दिवशी साजरा केला जातो. या वेळी लोक त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी गायीसमोर स्वत: ला समर्पित करतात.

हा उत्सवही भव्य पद्धतीने साजरा केला जातो. गोपालक आपली गाय तयार करतात आणि गोवर्धननाथ मंदिराजवळ सर्वजण जमतात. गायीला घेऊन मंदिराभोवती 7 फेऱ्या मारल्या जातात. त्यानंतर गायीच्या समोर इच्छाधारी लोक स्वत:ला समर्पित करतात. यावेळी त्यांच्या अंगावर एकसाथ अनेक गायी जातात. या संपूर्ण प्रकारत कोणीही जखमी झालेलं नाही असा दावा देखील स्थानिकांनी केला आहे. ही प्रथा पिढ्यांनपिढ्या चालत आली आहे. त्यामुळे इथल्या स्थानिकांची देखील या प्रथेवर अपार निष्ठा असल्याची माहिती मिळाली आहे.

हे वाचा-दिवाळीत निघालं दिवाळं; सामानाने भरलेल्या दुकानात घुसली भरधाव कार; पाहा PHOTOS

गायींचं वजन इतकं जास्त असून देखील कुणालाही इजा झाली नाही. इच्छा आणि विश्वास असेल तर हे व्रत पूर्ण देखील तितक्याच निष्ठेनं होतं असा भाविकांचा समज आहे. त्याचबरोबर काही लोक नवस पूर्ण झाल्यावर हे व्रत पूर्ण करतात. अशीही श्रद्धा आहे की सर्व पाप धुवण्यासाठी जसं गंगेत स्थान करावं अशी म्हणण्याची प्रथा आहे तसं गायीला समर्पण केल्यानंतर ही पाप दूर होता असं मानण्याची देखील इथे अजब प्रथा आहे. या विश्वासांमुळे, दरवर्षी मोठ्या संख्येने लोक या परंपरेत भाग घेतात.

गाय-गौरी उत्सवात मोठ्या संख्येने दिसणार्‍या लोकांची गर्दीही फुलते. यामध्ये मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग आहे. गाय गौहरीची ही परंपरा वर्षानुवर्षे चालू आहे, धोकादायक असूनही आजपर्यंत कोणताही अपघात झाला नाही हा एक चकत्कार असल्याचं देखील इथले लोक मानतात.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 14, 2020, 11:07 PM IST
Tags:

ताज्या बातम्या