जबलपूर, 16 मार्च : मध्यप्रदेशातील जबलपूर हायकोर्टानं मुलींच्या हक्काचं रक्षण करणारा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. हायकोर्टानं म्हटलं, की लग्न झालेली मुलगीही अनुकंपा तत्वावर नोकरी मिळण्यासाठी पात्र आहे. नव्हे तो तिचा हक्कच आहे. (Married Daughter Eligible For Compassionate Appointment)
या आदेशात कोर्टानं स्पष्ट म्हटलं आहे, की एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मागे त्याच्यावर अवलंबून असणाऱ्यांमध्ये बेरोजगार मुलगा नसेल तर मुलगीही अर्ज करू शकते. तिचं लग्न झालेलं आहे की ती अविवाहित आहे यानं काहीच फरक पडत नाही. (Jabalpur High Court)
सतना इथं राहणाऱ्या प्रीति सिंह हिनं हायकोर्टात जनहित याचिका केली होती. वकील अनिरुद्ध पांडे यांनी तिची बाजू मंडळी. याचिकेमध्ये प्रीतिनं सांगितलं, की तिची आई मोहिनी सिंह कोलगवा पोलीस स्थानकात एएसआयच्या पदावर कार्यरत होती. 23 ऑक्टोबर 2014 रोजी सकाळी नोकरीवर जाताना रस्त्यावरच्या अपघातात तिचा मृत्यू झाला. (Court Judgement on Married Daughter Compassionate Appointment)
हेही वाचा Maratha Reservation : 11 सदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी घ्यावी, कोर्टात मागणी
यानंतर प्रीति सिंहनं अनुकंपा तत्वावरच्या नोकरीसाठी अर्ज केला होता. भोपाळ पोलिस मुख्यालयानं तिचा राज फेटाळत म्हटलं होतं, की लग्न झालेली मुलगी अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी पात्र असू शकत नाही. तिला तो हक्क पोचत नाही. (High Court Compassionate Appointment Decision)
मुलींसाठी मोलाचा ठरेल निर्णय
न्यायाधीश संजय द्विवेदी यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यादरम्यान प्रीती सिंहच्या वकिलानं बाजू मांडली, की भारतीय संविधानाच्या अनुच्छेद - 14 मध्ये समानतेचा अधिकार दिलेला आहे. याच कारणानं अनुकंपा नियुक्तीबाबतही भेदभाव केला जाऊ शकत नाही. लग्न झालेल्या मुलाला अनुकंपा तत्वावर नोकरी मिळू शकते तर मग मुलीला का नाही? (Jabalpur High Court Married Daughter PIL Decision)
हेही वाचा NOTAला अधिक मतं मिळाल्यास निवडणूक रद्द? न्यायालयाची केंद्रासह EC ला नोटीस
कोर्टानं प्रीति सिंहच्या वकिलांच्या मांडणीला दुजोरा देत प्रीतिला अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचे आदेश दिले. या आदेशात म्हटलेलं आहे, की याचिकाकर्ता विवाहित असली तरी तिला अनुकंपा तत्वावर नोकरी दिली गेली पाहिजे. (priti sinh PIL Jabalpur high court)
आता हा आदेश अनेक मुलींसाठी लाखमोलाचा आशीर्वाद ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: High Court, Job, Madhya pradesh, Woman