मध्य प्रदेशात 35 वर्षांच्या युवकाचा कोरोनाने मृत्यू, देशांमधल्या मृतांमध्ये सगळ्यात तरूण

मध्य प्रदेशात 35 वर्षांच्या युवकाचा कोरोनाने मृत्यू, देशांमधल्या मृतांमध्ये सगळ्यात तरूण

हा तरुण विदेशात गेलेले नव्हता मात्र वैष्णव देवी यात्रेवरून तो परतला होता. त्यानंतर तो एका लग्न समारंभातही गेला होता.

  • Share this:

 इंदूर 26 मार्च :  कोरोना देशातल्या अनेक राज्यांमध्ये झपाट्याने हातपाय पसरत आहे. मध्य प्रदेशातल्या इंदूरमध्ये आज 35 वर्षांच्या कोरोनाग्रस्त तरूणाचा मृत्यू झाला. देशामध्ये कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला त्यामधला हा युवक सर्वात तरुण होता. या आधी बिहारची राजधानी पाटण्यात एका 38 वर्षांच्या युवकाचा मृत्यू झाला होता. कोरोनाचा मध्य प्रदेशातला हा दुसरा मृत्यू आहे. इंदूरमधल्या एम.वाय.एच.हॉस्पिटलमध्ये त्याला भरती करण्यात आलं होतं.

हा तरुण विदेशात गेलेले नव्हता मात्र वैष्णव देवी यात्रेवरून तो परतला होता. त्यानंतर तो एका लग्न समारंभातही गेला होता. त्याच दरम्यान त्याला लागण झाली असावी असा संशय व्यक्त केला जातोय. कोरोना राज्यात झापाट्याने पसरत असल्याने इंदूर शहराला हाय रिस्क सीटी म्हणून घोषीत करण्यात आलं आहे.

मध्यप्रदेशात 21 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून त्यात भोपाळमध्ये 2, ग्वाल्हेरमध्ये 1, शिवपुरी 1, इंदूर 10, उज्जैन 1 आणि जबलपूरमध्ये 6 रुग्ण आढळून आले आहेत.

2 महिन्यांचा लॉकडाउन अखेर उठला; एकही रुग्ण न सापडल्याने या प्रांताने घेतला मोकळा

सर्व जग सध्या कोरोना व्हायरसने भयग्रस्त आहे. लोकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. या व्हायरसविषयी जगभर सर्व संस्था आणि सरकारे प्रचंड जनजागृती करत आहे. तरीही कोरोनाविषयी समाजांपेक्षा गैरसमजच जास्त असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. कोरोना झाला म्हणजे मृत्यूच होतो अशी सर्वात मोठी भीती लोकांमध्ये आहे. मात्र हे 100 टक्के खरं नाही असं तज्ज्ञांनी सांगितलंय. कोरोनामुळे मृत्यू होण्याची शक्यता ही 1 टक्के असल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केल्याचं वृत्त ‘बीबीसी’ने दिलं आहे.

वय जेवढं जास्त असेल तेवढा धोका जास्त असतो. ज्यांना ह्रदयविकार, हाय डायबेटीज, ब्लड प्रेशर किंवा इतर आजार असतात त्यांना कोरोना झाल्यास ही शक्यता वाढू शकते. तर तरुणांमध्ये कोरोनातून बरे होण्याची शक्यता आणखी वाढते असं मतही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.

VIDEO : लॉकडाऊनमध्ये मशिदीत जाणं पडलं महागात, नमाजनंतर पोलिसांनी अशी केली धुलाई

सध्या जगभर यावर संशोधन सुरू असून अजुनही ठोस निष्कर्ष निघू शकलेले नाहीत. चीन नंतर इराण, इटली,

 

First published: March 26, 2020, 10:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading