Co-vaccine घेण्यासाठी नवऱ्यानं मागितली परवानगी, पत्नी म्हणाली...

Co-vaccine घेण्यासाठी नवऱ्यानं मागितली परवानगी, पत्नी म्हणाली...

को व्हॅक्सिन (Co-vaccine) च्या ट्रायलसाठी स्वयंसेवकांची शोधाशोध करणाऱ्या एक यंत्रणेसाठी एक चांगली बातमी आहे. मध्य प्रदेशातल्या (M.P.) इंदूरमधील (Indore) एका दाम्पत्याने स्वत:हून भोपाळमध्ये दाखल होत टेस्ट करुन घेतली. त्यांच्या या निर्णयाचे नातेवाईंकानीही अनुकरण केलं आहे.

  • Share this:

भोपाळ, 10 डिसेंबर : कोरोना व्हायरस (COVID-19) च्या दहशतीखाली सध्या सर्व जग वावरत आहे. सर्व जगाला सध्या करोनावरील लशीची (COVID-19 Vaccine ) आतुरतेनं प्रतीक्षा आहे. ब्रिटनमध्ये (Britain) एका वृद्ध महिलेला पहिली लस टोचवण्यात आली आहे. जगभर देखील या विषयावर संशोधन सुरूआहे.

मध्य प्रदेशातल्या (M.P.) इंदूरमधील (Indore) एका दाम्पत्याने स्वत:हून भोपाळपर्यंत प्रवास करत टेस्ट करुन घेतली. त्यांनी याबाबत एक सकारात्मक उदाहरण समाजासमोर ठेवलंय. त्यांच्या या पुढकाराने त्यांचे नातेवाईक देखील प्रभावित झाले असून ते सर्व जण आता कोव्हिड योद्धा बनले आहेत.

‘हम साथ साथ है’

इंदूरचे मनोज राय आणि त्यांची पत्नी पूजा अशी या कोव्हिड योद्धा पती-पत्नींची नावं आहेत. भोपाळमध्ये कोरोना लशीच्या चाचणीचा तिसरा टप्पा सुरू आहे. या चाचणीसाठी पती-पत्नी दोघांनीही या चाचणीसाठी आपलं नाव नोंदवलं आहे. भोपाळच्या पीपल्स मेडिकल कॉलेजमध्ये हे काम सध्या युद्ध पातळीवर राबवण्यात येतंय. मनोज हे देखील या कामाशी संबंधित आहेत. त्यामुळे त्यांची भोपाळला नेहमी ये-जा सुरू होती.

कोव्हिड व्हॅक्सिनच्या तिसऱ्या टेस्टसाठी स्वयंसेवक होण्याची इच्छा मनोजने त्यांची पत्नी पूजाला बोलून दाखवली. त्यावेळी पूजा यांनी कोणतीही आडकाठी न ठेवता मनोज यांना परवानगी दिलीच, त्याचबरोबर स्वत:देखील स्वयंसेवक होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर हे जोडपे जवळपास 200 किलो मीटरचा प्रवास करुन भोपाळमध्ये दाखल झाले, आणि त्यांनी टेस्ट दिली.

घरच्यांचाही पाठिंबा

मनोज आणि पूजा यांच्या या निर्णयाला त्यांच्या घरच्यांनी देखील पाठिंबा दिला. या निर्णयाचा वडील कांतीलाल राय आणि आई सोनाबाई यांनाही आनंद झाला होता. देश आणि समाजाच्या भल्याचं काम नक्की केलं पाहिजे, असा कानमंत्र त्यांनी दिल्याचा अनुभव मनोज यांनी सांगितला.

मनोज यांच्या या उदाहरणामुळे त्यांच्या नातेवाईकांनाही प्रेरणा मिळाली आहे. त्यांचे पाच नातेवाईक आता कोव्हिड योद्धा बनले असून त्यांनी देखील सर्वांनी भोपाळमध्ये जावून व्हॅक्सिनसाठी पहिली टेस्ट दिली आहे. आता पाच जानेवारी रोजी या सर्वांची दुसरी टेस्ट होणार आहे.

Published by: News18 Desk
First published: December 10, 2020, 2:00 PM IST
Tags: covid19

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading