News18 Lokmat

इंदूरमध्ये 4 मजली इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

सुत्र्यांच्या माहितीनुसार, आधी या हॉटेलची डावी बाजू ऑटो पार्ट्सच्या दुकानावर कोसळली. आणि मग काही सेकंदातच संपूर्ण इमारत पत्त्याच्या घरांसारखी खाली कोसळली.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Apr 1, 2018 09:07 AM IST

इंदूरमध्ये 4 मजली इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

01 एप्रिल : मध्यप्रदेशातल्या इंदूरमध्ये 4 मजली हॉटेलची इमारत कोसळल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 4 जणांना जखमी अवस्थेत ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं आहे. सुमारे 40 जण या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याचं सांगण्यात येतं आहे.

इंदौरमधील सरवटे बस स्टँडजवळ एम एस हॉटेल आहे. या चार मजली हॉटेलमध्ये एकूण 25 खोल्या होत्या. हॉटेलची इमारत धोकादायक स्थितीत होती. महापालिकेने इमारतीला धोकादायक असं जाहीर केले होतं का याबाबत अजून कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

सुत्र्यांच्या माहितीनुसार, आधी या हॉटेलची डावी बाजू ऑटो पार्ट्सच्या दुकानावर कोसळली. आणि मग काही सेकंदातच संपूर्ण इमारत पत्त्याच्या घरांसारखी खाली कोसळली. घटना घडताच स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्याला सुरुवात केली. काही वेळातच अग्निशामक दल आणि आपत्कालीन यंत्रणांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. अजूनही मदतकार्य सुरू असून दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

या अपघातादरम्यान सगळेजण हॉटेलमध्ये जेवण करत होते. त्याचबरोबर हॉटेलमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती. त्यामुळे या अपघातातून मोठी जीवित हानी झाली आहे. इंदूरच्या महापौर मालिनी गौर स्वतः बचावकार्यावर लक्ष ठेवून आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 1, 2018 09:07 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...