Home /News /national /

रिसॉर्टमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहा VIDEO ! बंडखोर आमदारांना मनवण्यासाठी गेलेल्या काँग्रेस मंत्री आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की

रिसॉर्टमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहा VIDEO ! बंडखोर आमदारांना मनवण्यासाठी गेलेल्या काँग्रेस मंत्री आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की

ज्योतिरादित्य यांचे समर्थक काँग्रेस आमदार गेले काही दिवस राज्यातून गायब होते. ते बंगळुरूमधल्या एका रिसॉर्टमध्ये आहेत. कमलनाथ सरकारमधले मंत्री त्यांना मनवण्यासाठी तिथे पोहोचले.

  भोपाळ, 12 मार्च : ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजप प्रवेशानंतर मध्य प्रदेशच्या राजकारण ढवळून निघालं आहे. ज्योतिरादित्य यांचे समर्थक काँग्रेस आमदार गेले काही दिवस राज्यातून गायब होते. ते बंगळुरूमधल्या एका रिसॉर्टमध्ये आहेत. कमलनाथ यांच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्री या काँग्रेस आमदारांना भेटायला थेट बंगळुरूला पोहोचले. पण तिथे मात्र पोलीस आणि हे मंत्री यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झडली. त्यांच्यात धक्काबुक्कीही झाली. अखेर जीतू पटवारी आणि लाखन सिंह या दोन मंत्र्यांना पोलिसांनी अटक केली आहे. ज्योतिरादित्य शिंदेंच्या समर्थकांना मनवण्याचा प्रयत्न काँग्रेसतर्फे केला जात आहे. जीतू पटवारी आणि लाखन सिंह हे दोन मंत्री त्यासाठी बंगळुरूला पोहोचले. पण ज्या रिसॉर्टमध्ये शिंदे समर्थक आमदार आहेत तिथे मोठा पोलीस बंदोबस्त होता. पोलिसांबरोबर या दोन आमदारांची आणि समर्थकांची झटापट झाली. पटवारी आणि लाखन सिंह यांना पोलिसांनी अटकही केली. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देण्याआधीच काँग्रेसचे 21 आमदार राज्यातून निघून गेले होते. ते बंगळुरूच्या रिसॉर्टमध्ये आहेत. या आमदारांना भाजपने बळजबरीने डांबून ठेवलं असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. कर्नाटकात भाजपचं सरकार आहे. त्यांनी पोलिसांवर दबाव आणून मुद्दाम जितू पटवारी आणि लाखन सिंह या दोन मंत्र्यांना अटक केली, असाही काँग्रेसचा आरोप आहे. पाच ते सहा बंडखोर आमदारांचं मन वळवण्यात जीतू पटवारी यशस्वी झाल्याचं सांगण्यात येत आहे. अन्य बातम्या महाराष्ट्राबाहेरही भाजपला आहे 'अजित पवार - 2' ची भीती; अमित शाहांचं सावध पाऊल मध्य प्रदेशात सरकार वाचवण्यासाठी कमलनाथ यांची खटपट, 6 बंडखोरी मंत्र्यांना हटवणार

  'दैव देतं आणि कर्म नेतं', शिंदेंच्या भाजप प्रवेशावर शिवसेनेची काँग्रेसवर खरमरीत टीका

  Published by:अरुंधती रानडे जोशी
  First published:

  Tags: Jyotiraditya scindia, Kamal Nath, Madhya pradesh

  पुढील बातम्या