लखनऊ, 21 जुलै : मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) राज्यपाल लालजी टोंडन (Lalji Tondon) यांचे आज सकाळी लखनऊच्या मेदांता रुग्णालयात निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. उत्तर प्रदेश सरकारचे कॅबिनेट मंत्री आणि मुलगा आशुतोष टंडन ट्वीट करून ही माहिती दिली. लालजी टंडन यांच्यावर सुमारे दीड महिन्यांपासून मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. मूत्रपिंड आणि यकृताच्या समस्येमुळे त्यांना दीड महिन्यापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
टंडन यांना 11 जून रोजी श्वास घेण्यास त्रास आणि ताप यामुळे रुग्णालयात दाखल केले होते. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्यावर टंडन यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे याआधीच मध्य प्रदेशचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. मूळचे उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये सक्रिय असलेले टंडन अनेक वेळा राज्यातील भाजप सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत आणि अटलबिहारी वाजपेयी यांचे सहकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या मतदारसंघ लखनऊची कमान सांभाळली होती. वाजपेयी यांच्या निधनानंतर लखनऊमधूनच ते 15 व्या लोकसभेवरही निवडून आले होते.
Madhya Pradesh Governor Lalji Tandon passes away; his son Ashutosh Tandon announces his demise pic.twitter.com/MB0kVjdRCf
— ANI (@ANI) July 21, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत लालजी टंडन यांना श्रद्धांजली वाहिली.'श्री लालजी टंडन त्यांच्या समाजकार्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांसाठी नेहमी स्मरणात राहतील. उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीला मजबूत करण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. एक प्रभावी प्रशासक म्हणून त्यांनी त्यांची ओळख बनवली आहे आणि नेहमी लोककल्याणाला अधिक महत्त्व दिले आहे. त्यांच्या निधनामुळे मी खूप दु:खी झालो आहे', अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
Shri Lalji Tandon will be remembered for his untiring efforts to serve society. He played a key role in strengthening the BJP in Uttar Pradesh. He made a mark as an effective administrator, always giving importance of public welfare. Anguished by his passing away. pic.twitter.com/6GeYOb5ApI
— Narendra Modi (@narendramodi) July 21, 2020
बिहार आणि मध्य प्रदेशचे राज्यपाल म्हणून पाहिलं काम
लालजी टंडन यांना 2018 मध्ये बिहारचे राज्यपाल होते. त्यांनतर 2019 मध्ये त्यांची मध्य प्रदेशच्या राज्यपाल पदावर नियुक्ती करण्यात आली होती. लखनऊमध्ये लालजी टंडन यांची लोकप्रियता समाजातील प्रत्येक समुदायात होती. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे ते निकटवर्तीय त्याचप्रमाणे महत्त्वाचे सहकारी होते. 2004 मध्ये लोकसभा निवडणुकीआधी टंडन त्यांच्या वाढदिवशी महिलांना साडीवाटप करत होते, त्यावेळी अचानक त्याठिकाणी गोंधळ निर्माण झाला आणि चेंगराचेंगरीमध्ये 21 महिलांचा मृत्यू झाला होता. दरम्यान त्यानंतर टंडन यांना याप्रकरणी सर्व आरोपातून मुक्त करण्यात आले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Madhya pradesh