राज्य सरकारने केल्या 46 पोलीस श्वानांच्या बदल्या, आरोप-प्रत्यारोप सुरू!

राज्य सरकारने केल्या 46 पोलीस श्वानांच्या बदल्या, आरोप-प्रत्यारोप सुरू!

अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर होणारे वाद कमी की काय म्हणून आता श्वानांच्या बदल्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

  • Share this:

भोपाळ, 14 जुलै: सरकार बदलले की सरकारी अधिकारी आणि पोलिसांच्या बदल्या केल्या जातात. मर्जीतील अधिकारी मोक्याच्या ठिकाणी नियुक्त केले जातात. पण एका सरकारने राज्यातील चक्क 46 पोलीस श्वानाची बदली केली आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर होणारे वाद कमी की काय म्हणून आता श्वानांच्या बदल्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकारने पोलीस दलातील 46 श्वानांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांवरून भाजपने सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकार लोकांच्या हितावर काम करण्यापेक्षा अन्य विषयावर फोकस करत असल्याची टीका भाजपने केली आहे. सरकारने राज्य पोलिस दलातील 23 बटालियनमधील 46 श्वान आणि त्यांच्या हॅडलर्सची बदली केली आहे. विशेष म्हणजे बदलीच्या या आदेशात मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या घरात तैनात असलेल्या 'डफी' नावाच्या श्वानाच्या बदलीचा देखील समावेश आहे. याशिवाय 'रेणु' आणि 'सिंकदर' या दोन श्वानांची सतना आणि होशंगाबाद येथून भोपाळ येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी करण्यात आली आहे.

भाजपचा हल्ला

अधिकाऱयांकडून केल्या जाणाऱ्या अपेक्षांचे समजून घेता येईल. पण ज्या प्राण्यांना बोलता येत नाही त्यांच्याकडून कसली अपेक्षा आहे. पोलीस दलातील श्वानांच्या पाचशे किलो मीटर लांब बदल्या करण्यात आल्या आहेत. सरकारकडे राज्याच्या हितासाठी अन्य कोणतेही विषय नसल्याचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष राकेश सिंह यांनी म्हटले आहे. राज्यातील काँग्रेस सरकारने तर बदली उद्योगात श्वानांना देखील सोडले नाही, अशी टीका भाजपचे उपाध्यक्ष विजेश लुनावत यांनी केली आहे.

राज्यातील सत्ता गमवल्यानंतर भाजप निराश झाली आहे आणि त्यांना श्वानांच्या बदल्यांवरून राजकारण करण्याची वेळ आली, अशा शब्दात काँग्रेसने भाजपच्या टीकेला उत्तर दिले आहे.

VIDEO: ब्रह्मपुत्रा नदीचं रौद्ररूप, पाण्यातल्या बोटीसारखी वाहून गेली शाळा

First published: July 14, 2019, 12:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading