मराठी बातम्या /बातम्या /देश /

काँग्रेसला उद्याच द्यावी लागणार परीक्षा; 'बहुमत सिद्ध करा नाहीतर...'

काँग्रेसला उद्याच द्यावी लागणार परीक्षा; 'बहुमत सिद्ध करा नाहीतर...'

मध्य प्रदेशात राजकारणानं पुन्हा एकदा नाट्यमय वळण घेतलं. बजेट सेशन लांबवण्यात आलं असलं, तरी राज्यपालांनी कमलनाथ यांना पत्र लिहून उद्याच्या उद्या फ्लोअर टेस्ट घेण्याविषयी सांगितलं आहे.

    भोपाळ, 16 मार्च : मध्य प्रदेशात (madhya pradesh)राजकीय नाट्य अद्याप संपलेलं नाही. त्याचा शेवटचा अंक उद्या होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांना पत्र लिहून राज्यपाल लालजी टंडन यांनी उद्याच्या उद्या म्हणजे 17 मार्चलाच फ्लोअर टेस्ट घ्या, असं सांगितलं आहे. 17 मार्चला फ्लोअर टेस्ट घेतली गेली नाही, तर काँग्रेसकडे बहुमत नाही, असं मानलं जाईल, असे स्पष्ट निर्देश राज्यपालांनी दिले आहेत. त्याआधी आज मध्य प्रदेश विधानसभेच्या बजेट सेशनला सुरुवात होणार होती. पण पहिल्याच दिवशी प्रचंड गदारोळानंतर कामकाज थांबवण्यात आलं. अर्थसंकल्पीय अधिवेशन 26 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आलं. या वेळात काँग्रेसला बंडखोर आमदारांचं मन वळवणं सोपं जाईल, असं मानण्यात येत होतं. पण आता राज्यपाल लालजी टंडन यांच्या पत्रानंतर कमलनाथ सरकारपुढच्या अडचणी वाढल्या आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपप्रवेश केल्यानंतर मध्य प्रदेशातलं काँग्रेस सरकार अस्थिर झालं. ज्योतिरादित्य यांच्या समर्थक 22 काँग्रेस आमदारांनी राजीनामे दिले आणि त्यामुळे सरकार अल्पमतात आलं. आमच्याकडे बहुमत असल्याचा दावा कमलनाथ यांनी केला असला, तरी त्यांना आता ते उद्याच्या उद्याच सिद्ध करावं लागणार आहे. वाचा - नवी मुंबईत भाजपला आणखी 2 दणके, नगरसेवकांनी राजीनामा देताच हाती धरला धनुष्यबाण विधानसभेचं कामकाज आणि पर्यायाने फ्लोअर टेस्ट 26 मार्चपर्यंत पुढे ढकलल्यानंतर भाजपने बहुमत चाचणी लवकरात लवकर घेण्याची मागणी केली होती. 106 आमदारांची राज्यपालांपुढे परेड घेऊन जात त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला. त्यानंतर राज्यपाल लालजी टंडन यांनी कमलनाथ यांना पत्र लिहून 17 मार्चला बहुमत चाचणी घेण्याविषयी सांगितलं आहे. कमलनाथ यांनी तत्पूर्वी आमचं सरकार अल्पमतात नसल्याचा दावा केला होता. भाजपला तसं वाटत असेल तर त्यांनी अविश्वास ठराव मांडावा, असं आव्हान दिलं होतं. अन्य बातम्या निर्भयाच्या दोषींनी आंतरराष्ट्रीय कोर्टाचं दार ठोठावलं, बचावासाठी नवी क्लृप्ती दिल्ली पुन्हा हादरली; पोलीस जवानाची गोळी घालून हत्या, एक जखमी
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Kamal Nath, Madhya pradesh

    पुढील बातम्या