MP च्या राजकारणात नवा ट्वीस्ट, ज्योतिरादित्य यांचा आज भाजप प्रवेश

MP च्या राजकारणात नवा ट्वीस्ट, ज्योतिरादित्य यांचा आज भाजप प्रवेश

ज्योतिरादित्यांच्या भाजप प्रवेशामुळे मध्य प्रदेशातील अनेक राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्हं आहेत.

  • Share this:

भोपाळ, 11 मार्च : मध्य प्रदेशातील राजकारण आता वेगळं वळण घेताना पाहायला मिळणार आहे. याचं कारण म्हणजे ज्योतिरादित्य शिंदे आज भाजपात प्रवेश करणार आहेत. जोतिरादित्य शिंदेचा भाजप प्रवेश कधी होणार याबद्दल सस्पेन्स अखेर संपला आहे. बुधवारी दुपारी 12.30 वाजता जोतिरादित्य भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत 22 आमदारही भाजपात प्रवेश करणार आहेत. अचानक दिलेल्या या राजीनाम्यामुळे काँग्रेस पक्षासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. ज्योतिरादित्यांच्या भाजप प्रवेशामुळे मध्य प्रदेशातील अनेक राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्हं आहेत. आमदार फुटू नयेत यासाठी काँग्रेसच्या आमदारांना आज जयपूरला हलवण्यात आलं आहे. काँग्रेसकडून आणखी आमदार फुटणार नाहीत यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे.

मध्यप्रदेशात काँग्रेस सरकारवर आलेल्या ज्योतिरादित्य संकटामुळे मुख्यमंत्री कमलनाथ यांचं सरकार अडचणीत आलं आहे. काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर त्याचे समर्थक असलेल्या काँग्रेसच्या २२ आमदारांनी सुद्धा मुख्यमंत्री कलनाथ यांच्याकडे राजीनामे सोपवले. यामुळे सरकार अल्पमतात आलं आहे. काँग्रेस श्रेष्ठींनी ज्योतिरादित्य शिंदे यांचा राजीनामा मंजूर करताच त्यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेटही घेतली. यानंतर मध्यप्रदेशात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पण सरकार अल्पमतात आहे हे मान्य करायला कमलनाथ मात्र तयार नाहीत.

काय करणार कमलनाथ?

अडचणीत आलेल्या मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपले विश्वासून सहकारी सज्जनसिंह वर्मा यांच्यावर नाराज आमदारांची समजूत काढण्याची जबाबदारी सोपवली आहे. कमलनाथ यांच्यावर नाराज असलेले आणि ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक आमदार बंगळुरू ला एका हॉटेलमध्ये राहात आहेत. या सगळ्या नाराजांची समजूत काढण्यासाठी (Sajjan Singh Verma) स्वत: बंगळुरू (Bengaluru) ला जाऊ शकतात. काल संध्याकाळी भाजपाच्या संसदीय मंडळाची बैठक होती, त्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा होती. पण आता नव्या माहितीनुसार शिंदे १२ मार्चला काही भाजपात प्रवेश घेऊ शकतात. यामुळे काँग्रेसला नाराजांची समजूत काढण्यासाठी आणखी वेळ मिळणार आहे. यामुळे कमलनाथ यांनी नाराजांंचं मन वळवण्याचा विश्वास आहे.

First published: March 11, 2020, 12:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading