ना हात, ना पाय; फक्त डोकं आणि धडासह जन्माला आली मुलगी; मग कुटुंबाने...

ना हात, ना पाय; फक्त डोकं आणि धडासह जन्माला आली मुलगी; मग कुटुंबाने...

हातापायाशिवाय जन्माला आलेल्या या बाळाची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

  • Share this:

भारत रावत/विदिशा, 28 जून : आजही अनेकांना मुलगी नकोशी होते. अनेकदा गर्भातच मुलींना मारून टाकण्याचा प्रयत्न केला जातो. अशात जर त्या मुलीमध्ये व्यंग असेल तर मुलगा हवा असलेली कुटुंबं त्या मुलीसह काय करतील याची कल्पनाही आपण करू शकत नाही. मात्र मध्य प्रदेशमधील ((Madhya Pradesh) एका कुटुंबाने आपल्या घरी जन्माला आलेल्या अशा मुलीला देवाचा आशीर्वादच समजलं आहे आणि हे खरंच खूप कौतुकास्पद आहे.

विदिशा जिल्ह्यातील (Vidisha) सिरोंजजवळील (sironj) सांकला (Sankla) गावात राहणाऱ्या सोनू वंशकार यांच्या घरात एका मुलीने (baby girl) जन्म घेतला. मात्र जन्मलेल्या त्या मुलीला पाहून सर्वांनाच धक्का बसला. कारण या मुलीला दोन्ही हात नाहीत आणि पायही नाहीत. फक्त डोकं आणि धडासह हे बाळ जन्माला आलं आहे. तिला हातपाय नसले, तरी ती पूर्णपणे निरोगी आहे. तिचं हृदय सुरळीत सुरू आहे आणि श्वास घ्यायलादेखील तिला त्रास होत नाही.

हे वाचा - अभिमन्यूनं भेदलं अशिक्षिततेचं चक्रव्यूह, शेतकऱ्याच्या मुलाची लय भारी कहाणी

सिरोंजच्या राजीव गांधी रुग्णालयाच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हात-पाय नसले तरी बाळाला कोणताही समस्या नाही. ती आईचं दूधदेखील नीट पिऊ शकतो. शारीरिक व्यंगाशिवाय तिच्यामध्ये दुसरी कोणतीच समस्या नाही.

रुग्णालयातील डॉ. राहुल चंदेलकर यांनी सांगितलं, हा एक जन्मजात आजार आहे. लाखोंमध्ये एकाला हा आजार होतो. याला ट्रेट एमेलिया असं म्हणतात.

हे वाचा - आर्थिक अडचण त्यात पत्नीने सोडलं घर, मुंबईत 3 मुलांसह पतीने केली आत्महत्या

या बाळाची चर्चा सर्वत्र होऊ लागली. बाळाची आजी सक्काबाई यांनी सांगितलं, आमच्या कुटुंबात आतापर्यंत कोणतीही व्यक्ती अपंग जन्माला आली नाही. या मुलीच्या जन्मामुळे आम्हाला आश्चर्य वाटत आहे. ही मुलगी म्हणजे आम्हाला देवाने दिलेला आशीर्वादच आहे.

असे सकारात्मक बदल समाजात आता दिसून यायला लागलेत हे खरंच खूप चांगलं आहे.

संपादन - प्रिया लाड

First published: June 28, 2020, 3:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading