मुरैना, 30 नोव्हेंबर : नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी दिल्लीत एकवटले आहेत. शेतकऱ्यांचं आंदोलन एका बाजूला सुरू असताना दुसरीकडे एक धक्कादायक घटना घडली आहे. दिवसाढवळ्या भाजी बाजारपेठेत दोन गटांमध्ये झालेल्या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं आणि तरुणानं गोळीबार सुरू केला. या गोळीबारात एक शेतकरी गंभीर जखमी झाला आहे.
मध्य प्रदेशातील मुरैना कृषी बाजारपेठेत ही धक्कादायक घटना घडली आहे. बाजारपेठेत कोणत्या कारणावरून वाद झाला हे अद्याप समजू शकलं नाही पण दोन गटांमध्ये झालेल्या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. दोन्ही संतप्त गटांमध्ये अरेरावीची भाषा सुरू झाली. ही धक्कादायक घटना शहरातील कोतवाली ठाणा क्षेत्रातील कृषी बाजापेठेत घडल्यानं खळबळ उडाली आहे.
Madhya Pradesh: A man (in red t-shirt) was seen firing bullets at an agriculture market in Morena. ASP Morena Hansraj Singh says, "Two groups of farmers had entered into a dispute. One of these two beat up the other and fired bullets. FIR being registered. Action will be taken." pic.twitter.com/3qhytoC3UK
या वादादरम्यान एका तरुणानं बंदुकीनं तुफान गोळीबार सुरू केला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तरुण गोळीबार करून फरार झाला मात्र या गोळीबारात एक शेतकरी जखमी झाला आहे. या शेतकऱ्याला स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून या व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या मदतीनं आरोपींचा शोध सुरू आहे. मुरैना पोलिसांनी घटनास्थळावरून काडतूसं जप्त केली असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.